शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अशरफ गनींनी सांगितला काबुल सोडतानाचा थरार; म्हणाले, "दोन मिनिटात घेतला निर्णय, पळालो नसतो तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 3:23 PM

1 / 9
अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपलं सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेचं सैन्य माघारी निघण्यास सुरूवात झाल्यानंतर काही कालावधीतच तालिबाननं पुन्हा हातपाय पसण्यास सुरूवात केली होती. काबूलवर कब्जा मिळवण्यापूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देशातून पलायन केल्याची माहिती समोर आली होती.
2 / 9
दरम्यान, अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय आपण काही मिनिटांमध्ये घेतला होता. तसंत काबुल सोडण्याच्या निर्णयाबाबत आपल्यालाही कल्पना नव्हती, असं अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी सांगितलं. बीबीसी रेडियो ४ शी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.
3 / 9
'जेव्हा १५ ऑगस्टला काबुलवर कब्जा करण्यात आला आणि माझं सरकार पाडलं, त्यावेळी हा माझा अफगाणिस्तानातील अखेरचा दिवस असेल असं मला वाटलंही नव्हतं,' असं गनी म्हणाले.
4 / 9
'दुपारपर्यंत राष्ट्राध्यक्ष भवनाची सुरक्षाही संपली होती. जर मी कोणतीही भूमिका घेतली असती, तर ते सर्व मारले गेले असते. ते माझाही बचाव करण्यास सक्षम नव्हते,' असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
5 / 9
'देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब यांच्या मनातही भीतीचं वातावरण होतं. मला दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ देण्यात आला नाही. त्यांनी खोस्त, जलालाबाद आदी शहरांबाबत विचार केला, परंतु ती शहरं यापूर्वीच तालिबानच्या ताब्यात होती,' असं गनी म्हणाले.
6 / 9
जेव्हा आम्ही उड्डाण घेतलं तेव्हा आम्ही देश सोडून जातोय हे स्पष्ट होतं, असंही त्यांनी सांगितलं. गनी यांनी देश सोडल्यापासून ते संयुक्त अरब अमिरातीमध्येच आहेत.
7 / 9
अफगाणिस्तान सोडताना गनी यांनी आपल्यासोबत पैसे नेले असाही आरोप करण्यात आला होता. याशिवाय यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. यावरही गनी यांनी स्पष्टीकरण दिलं.
8 / 9
देश सोडताना आपण पैसे नेल्याचे आरोप गनी यांनी फेटाळून लावले. आपली पहिली चिंता ही काबुलमध्ये होणारी लढाई थांबवणं ही होती. काबुलला वाचवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं. हा कोणताही राजकीय करार नव्हता, हा हिंसक बदल होता, असंही त्यांनी स्पष्ट केला.
9 / 9
'माझ्या संपूर्ण जीवनात मी जी काही कामं केली ती यामुळे मातीत मिळाली. माझ्या मूल्यांनाही संपवण्यात आलं. अफगाणिस्तानमध्ये जे काही घडलं तो अफगाणिस्तानचा नाही, तर अमेरिकेचा मुद्दा बनला,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.
टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिका