उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनचा अजून एक सणकी निर्णय, हे काम केल्यास मिळणार थेट मृत्यूदंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 04:59 PM2021-07-19T16:59:23+5:302021-07-19T17:08:52+5:30

Kim Jong Un: उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन हा त्याच्या सणकी निर्णयांसाठी कुप्रसिद्ध आहे. तर या किम जोंगने आता उत्तर कोरियामधील नियमांना अधिकच कडक केले आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन हा त्याच्या सणकी निर्णयांसाठी कुप्रसिद्ध आहे. तर या किम जोंगने आता उत्तर कोरियामधील नियमांना अधिकच कडक केले आहे. आता उत्तर कोरियामध्ये नुकताच एक कायदा पास झाला आहे या कायद्यानुसार देशातील कुठल्याही नागरिकाने दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानच्या प्रसारमाध्यमांशी संबंधित कुठलीही माहिती शेअर केली तर त्याला थेट मृत्युदंड देण्यात येणार आहे.

दक्षिण कोरियामध्ये प्रचलित आपत्तीजनक शब्द आणि सर्वसाधारण बोलीभाषेलाही बंदी घातलेल्या गोष्टींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. दक्षिण कोरियातील हेअर स्टाइल आणि विदेशी फॅशनवरसुद्धा उत्तर कोरियामध्ये आदीच बंदी घातली गेलेली आहे.

उत्तर कोरियाची भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे. जर त्यांनी दक्षिण कोरियात वापरल्या जाणाऱ्या भाषेचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मृत्यूदंड दिला जाऊ शकतो, अशी ताकीद लोकांना देण्यात आली आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याने अजून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे जर कुणी दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांना फॉलो करत असल्याचे दिसून आले तर त्याला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.

उत्तर कोरियामधील वृत्तपत्र रोडोंग सिनमनमध्ये दक्षिण कोरियाच्या पॉप संस्कृतीपासून असलेल्या धोक्याबाबत लिहिले आहे. रंगिबिरंग कपड्यांमधील लोक आमच्या संस्कृतीमध्ये घुसून तिला नष्ट करू इच्छित आहेत. हे लोक हातात बंदुका असलेल्या लोकांपैक्षा धोकादायक आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कोरियन स्टडीजचे प्राध्यापक यांग मू-जिन यांना कोरिया हेराल्डशी बोलताना सांगितले की, किम जोंग उन स्वत: स्वित्झर्लंडमध्ये शिकलेले आहेत. मात्र कोरियन पॉप म्युझिक आणि वेस्टर्न कल्चर सहजपणे उत्तर कोरियाच्या लोकांना प्रभावित करू शकतात.

प्राध्यापक यांग मू-जिन यांनी सांगितले की, किम यांना माहिती आहे की यामुले त्यांच्या सोशालिस्ट सिस्टिमवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तरुण बंडखोर होऊ शकतात. याच कारणामुळे ते अन्य देशातील पॉप कल्चर, म्युझिक आणि मीडियाला आपल्या देशात प्रचलित होऊ देत नाहीत.