इतका मोठा देश तरी इतर देशांकडून खाण्या-पिण्याच्या गोष्टी मागवतो अमेरिका, भारताकडून काय घेतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:39 IST2026-01-23T13:04:50+5:302026-01-23T13:39:17+5:30

US Food Import From World: अमेरिका जगातील सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि जवळपास खाण्या-पिण्याच्या प्रत्येक गोष्टी तो दुसऱ्या देशांकडून मागवतो. अशात जाणून घेऊया की, अमेरिकेने कोणत्या देशावर किती टॅरिफ लावला आणि या देशांकडून तो काय मागवतात.

US Food Import From World: आपल्याला माहीत आहेच की, अमेरिका जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जगातील अनेक देशांसोबत अमेरिका व्यापार करते. अलिकडे अमेरिकेने अनेक देशांवर भरघोस टॅरिफ लावला. तरी सुद्धा अमेरिका जगातील सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि जवळपास खाण्या-पिण्याच्या प्रत्येक गोष्टी तो दुसऱ्या देशांकडून मागवतो. अशात जाणून घेऊया की, अमेरिकेने कोणत्या देशावर किती टॅरिफ लावला आणि या देशांकडून ते काय मागवतात.

अमेरिकेने कॅनडावर ३५ टक्के टॅक्स लावला आहे. पण अमेरिका कॅनडाकडून सगळ्यात जास्त मीट, मशरूम, डुकराचं मांस, ओट्स, मका, गहूं, मॅपल सिरप आणि मासे यासारख्या वस्तू मागवतात.

अमेरिकेने मेक्सिकोवर २५ टक्के टॅक्स लावला आहे. पण अमेरिका तेथून क्रेनबेरीज, स्ट्रॉबेरीज, रास्पबेरीज, टोमॅटो, एवोकाडो, शिमला मिरची, लिंबू, कांदे, पालक, लेट्यूस, काकडी, ब्रोकोली, कलिंगड, आंबे, एस्पेरेगस, साखर आणि अक्रोड आयात करतो.

अमेरिकेने ऑस्ट्रेलियावरही १० टक्के टॅरिफ लावला आहे, पण इथून मेंढ्यांचं मांस सगळ्यात जास्त मागवलं जातं. त्याशिवाय ब्राझिलवर ५० टक्के टॅरिफ लावला आहे, इथून अमेरिकेत सगळ्यात जास्त ऑरेंज ज्यूस मागवला जातो.

अमेरिका चीनकडून अॅपल ज्यूस, फ्रोजन फिश, चिलीतून द्राक्ष आणि पोल्ट्री, कोलंबियातून कच्ची कॉफी, इंडोनेशियातून पाम ऑइल, आयरलॅंडकडून बटर, इटलीकडून ऑलिव्ह ऑइल आणि कोस्टारिकाकडून अननस मागवतो.

अमेरिका न्यूझीलॅंडमधून दूध, नेदरलॅंडकडून कोको पावडर, स्पेनकडून रिफाइंड ऑलिव्ह ऑइल, स्वित्झर्लॅंडकडून रोस्टेड कॉफी, थायलॅंडकडून तांदूळ, व्हिएतनामकडून मिरची आणि काजू खरेदी करतो. भारताबाबत सांगायचं तर अमेरिका आपल्याकडून जास्त झिंगे, मसाले, काजू आणि चहा खरेदी करतो.