अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आज जाणार अंतराळ प्रवासावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:41 AM2021-07-20T11:41:37+5:302021-07-20T11:52:56+5:30

Amazone CEO Jeff Bezos: जेफ बेजोस यांच्यासोबत त्यांचा भाऊ मार्क, 18 वर्षीय ओलिवर डेमन आणि 82 वर्षीय वेली फंक असतील

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे त्यांचे बालपणीचे स्वप्न साकार करण्यासाठी आज अंतराळाच्या प्रवासावर जाणार आहे.

बेजोस त्यांच्याच 'ब्लू ओरिजिन' कंपनीच्या 'न्यू शेपर्ड' रॉकेटमधून आज अंतराळाच्या प्रवासासाठी रवाना होतील. या प्रवासात बेजोस केवळ 11 मिनिटे अंतराळात राहणार आहे.

बेजोस यांच्यासोबत इतर तिघे असतील. मिळालेल्या माहितीनुसार, बेजोस यांची टीम मागच्या आठवड्यात अंतराळात गेलेल्या रिचर्ड ब्रेनसन यांच्यापेक्षाही पुढे जाईल.

जेफ बेजोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीचे टूरिजम रॉकेट न्यू शेपर्ड आज चार जणांना घेऊन आंतराळात जातील.

त्या रॉकेमध्ये जेफ बेजोससह त्यांचे भाऊ मार्क, नीदरलँडमधील 18 वर्षीय ओलिवर डेमन आणि 82 वर्षीय महिला वेली फंक असतील.

नऊ दिवसांपूर्वीच व्हर्जिन गॅलेक्टिकचे रिचर्ड ब्रेनसन अंतराळात जाऊन आले आहेत.

पाच मजली इमारतीइतके उंच असलेल्या न्यू शेपर्ड रॉकेटला सहा जणांना घेऊन अंतराळात जाण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

हे रॉकेट प्रवाशांना जवळपास 340,000 फुट उंचीवर घेऊन जाईल. रॉकेटमधून वर गेल्यानंतर काही काळासाठी प्रवाशांना मायक्रोग्रॅविटीचरा अनुभव घेता येईल.

त्या उंचीवर गेल्यावर संपूर्ण पृथ्वी पाहता येईल. बेजोस यांचा अंतराळ प्रवास भारती वेळेनुसार, सायंकाळी 5 वाजता सुरू होईल.