By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:31 IST
1 / 8इराणचे कद्दावर नेते अली लारीजानी यांच्या इस्रायली हल्ल्यातील मृत्यूमुळे मध्य-पूर्वेतील चित्र पूर्णपणे पालटले आहे. लारीजानींना मारून ट्रम्प यांनी पुढे उपयोगी येणारा महत्वाचा मोहराच गमावला आहे. 2 / 8राजकीय तज्ज्ञ ट्रिटा पारसी यांच्या मते, या एका हत्येमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हे युद्ध थांबवणे आता अत्यंत कठीण होणार आहे. लारीजानी हे इराणच्या सत्तावर्तुळातील केवळ एक नेते नव्हते, तर ते 'किंगमेकर'च्या भूमिकेत होते.3 / 8लारीजानी हे केवळ मोठे नेतेच नव्हते तर इराणमधील विविध राजकीय गटांमध्ये समन्वय साधण्याचे आणि सर्वांची सहमती मिळवण्याचे काम करत असत. त्यांच्या अनुपस्थितीत इराणमध्ये कोणताही मोठा राजनैतिक निर्णय घेणे आता आव्हानात्मक झाले आहे.4 / 8ट्रम्प हे युद्ध संपवण्याच्या तयारीत असले तरी, इराणमधील या अस्थिरतेमुळे त्यांना संवाद साधण्यासाठी आता कोणताही 'विश्वासार्ह चेहरा' समोर उरलेला नाही.5 / 8इस्रायल असे हल्ले करू शकतो याची इराणला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांनी महत्त्वाच्या पदांसाठी आधीच नवीन फळी तयार ठेवली आहे. लारीजानींच्या जागी नवीन नेतृत्व लवकरच समोर येईल, असेही पारसी यांनी नमूद केले आहे.6 / 8लारीजानी यांच्या मृत्यूमुळे इराणमधील 'हार्डलायनर्स' (कट्टरपंथी) अधिक आक्रमक झाले असून, ते आता वाटाघाटींऐवजी थेट संघर्षाची मागणी करत आहेत.7 / 8यामुळे येत्या काही दिवसांत इस्रायल आणि अमेरिकन तळांवर हल्ले वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.8 / 8 लारीजानी हे केवळ लष्करी रणनीतीकार नव्हते, तर ते एक प्रकांड पंडितही होते. त्यांनी 'शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी'मधून गणितात पदवी घेतली होती, ज्यात ते सुवर्णपदक विजेते होते. त्यानंतर त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानात एम.ए. आणि पीएचडी पूर्ण केली. विशेषतः जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांट यांच्या विचारांवर त्यांनी सखोल संशोधन केले होते.