पुतीनचं जेल पाहून अंगावर येईल काटा; इथं जाण्यापेक्षा नस कापून जीव देतात कैदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 05:43 PM2021-03-01T17:43:03+5:302021-03-01T17:51:26+5:30

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या अॅलेक्सी नेव्हल्नी यांना देशातील सर्वात खतरनाक तुरुंगात शिक्षा भोगावी लागणार आहे. नेमका कसा आहे हा तुरुंग जाणून घेऊयात...

रशियात पेनल कॉलनी नंबर-१ आयके-२ (Penal Colony Number-2 IK-2) नावाचा एक तुरुंग आहे. या तुरुंगात शिक्षा भोगावी लागणार असल्याचं ऐकताच कैद्यांना चक्क ताप भरतो. अंगावर काटा आणणाऱ्या या तुरुंगात कुणीच जायला मागत नाही.

पुतीन यांच्या या तुरुंगात जाण्यापेक्षा कैदी स्वत:ला इजा करुन घेणं पसंत करतात. जेणेकरुन या तुरुंगात जाण्यापासून स्वत:ला रोखता येईल. काही कैद्यांनी तर थेट आपल्या हाताची नस कापून जीव देखील दिला आहे.

रशियातील या खतरनाक तुरंगाला IK-2 या नावानं देखील ओळखलं जातं. मॉक्सो शहरापासून जवळपास १०० किमी अंतरावर हा तुरुंग आहे. या तुरुंगात अतिशय क्रूर पद्धतीनं कैद्यांना टॉर्चर केलं जातं, असं सांगण्यात येतं. आता याच तुरुंगात अॅलेक्सी नेव्हन्ली यांना पुढील अडीच वर्ष शिक्षा भोगाव लागणार आहे.

अॅलेक्सी नेव्हन्ली यांना गेल्या महिन्यात जर्मनीतून परतल्यानंतर अटक करण्यात आली होती. आपल्याला जीवे मारण्यासाठी रशियन सरकारनं जहरी विष दिलं होतं असा आरोप नेव्हन्ली यांनी केला आहे. यातून बाहेर येण्यासाठी पाच महिने लागल्याचं ते म्हणाले आहेत.

रशियाचे नेते दिमित्री डेमुशकिन यांनी याच तुरुंगात दोन वर्षांची शिक्षा भोगली होती. तुरुंग इतका भयानक आहे की याचं नाव ऐकताच कैदी घामाघूम होऊन जातात आणि या तुरुंगात जाण्याऐवजी स्वत:ला भोसकून घेणं पसंत करतात, असं डेमुशकिन म्हणाले होते.

IK-2 या तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख असून तुरुंगाच्या भिंतीपासून १०० मीटर दूर राहण्याचे कडक नियम कैद्यांना घालून देण्यात आले आहेत.

तुरुंगातील नियमांचं उल्लंघन केल्यास जबर शिक्षा आणि टॉर्चर केलं जातं असंही काही कैदी सांगतात.