शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खळबळजनक! अब्जो रूपयांच्या महालात राहणारे पुतिन प्रेयसींवर उडवताहेत सरकारी खजीना, Alexei Navalny यांचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 9:29 AM

1 / 10
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधी मानले जाणारे एलेक्सी नवलनीने पुतिन यांच्या सीक्रेट लाइफबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्यांचा दावा आहे की, राष्ट्रपतींकडे १०० अब्ज रूपयांचं घर आहे आणि ते त्यांच्या प्रेयसींवर सरकारी खजान्यातील पैसा खर्च करत आहेत.
2 / 10
पुतिन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचं म्हणत नवलनी म्हणाले की, राष्ट्रपती आपल्या परिवारावर खासकरून १७ वर्षीय त्यांच्या मुलीलाही खर्चासाठी सरकारी खजान्यातून पैसे देतात. दरम्यान नवलनी यांना गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये 'नर्व एजेंट'(विष) देण्यात आलं होतं. ज्यामुळे ते गंभीर आजारी पडले होते.
3 / 10
एलेक्सी नवलीन यांच्यानुसार, व्लादिमीर पुतिन यांनी काळ्या समुद्राच्या तटावर १०० अब्ज रूपये खर्च करून एक आलिशान महाल बांधला आहे. इथे पोल डान्स आणि कॅसिनोसारख्या सुविधा आहेत.
4 / 10
नवलनी यांनी सांगितले की, पुतिन हे ज्या लोकांवर पैसा खर्च करत आहेत त्यात त्यांची कथित पार्टनर अलीना कबाएवा, आधीची पत्नी स्वेतलाना आणि त्यांची १७ वर्षीय मुलीचा समावेश आहे. पुतिनचे विरोधी म्हणाले की राष्ट्रपती स्वत:ला राजा समजतात आणि त्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे.
5 / 10
नवलनी म्हणाले की पुतिन यांच्या घरी सफाई करणारी क्रिवोनोगिख काही दिवसांपूर्वी एक सामान्य तरूणी होती. पण आता ती आश्चर्यजनकपणे फार श्रीमंत झाली आहे. कुणालाही माहीत नाही तिच्याकडे इतके पैसे कुठून आले.
6 / 10
त्यांनी दावा केला आहे की, क्रिवोनोगिखसोबत पुतिन यांची भेट १९९० मध्ये झाली होती आणि २००३ मध्ये तिने पुतिन यांच्या मुलाला जन्म दिला होता. कदाचित हेच कारण आहे की, तिला आता लक्झरी अपार्टमेंट मिळाले आहेत. इतकेच नाही तर तिला रोसैया बॅंकेत ३ टक्के हिस्साही देण्यात आला आहे.
7 / 10
एलेक्सी नवलनी यांनी दावा केला आहे की, क्रिवोनोगिखसाठी पुतिन यांनी एक ११८ फूट Yacht सुद्धा खरेदी केला आहे. ते म्हणाले की, देशात दोन कोटी गरीब आहेत. पण पुतिन हे त्यांच्या गर्लफ्रेन्डवर पैसा खर्च करत आहेत.
8 / 10
राष्ट्रपतींची कथित गर्लफ्रेन्ड अलीना कबाएवाबाबत ते म्हणाले की, आता ती रशियातील मोठे वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सना नियंत्रित करते. कवाएवाचा अधिकृत पगार ७.८ मिलियन पाउंड आहे. ते म्हणाले की, जर जिमनास्ट राहिलेली कबाएवा पुतिन यांच्या संपर्कात आली नसती आली तर इतका पैसा कधीही मिळवू शकली नसती.
9 / 10
नवलनी यांनी दावा केला आहे की, पुतिन यांच्या १०० अब्ज रूपयांच्या महालात स्ट्रीप क्लब कॅसिनो डान्स मॅट, स्पा आणि थिएटर आहे. याची थ्रीडी इमेज धक्कादायक आहे. घराबाहेर द्राक्षांची बाग आणि आत एक चर्च आहे.
10 / 10
नवलनी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या घराबाबत सगळी माहिती दिली आहे. या घराबाहेर कडक सुरक्षा आहे. या घराला प्रायव्हेट बीच आहे आणि खाजगी सुरक्षा आहे. हा पूर्ण परिसर नो फ्लाय झोनमध्ये येतो. याला एकप्रकारे रशियाच्या आत एक वेगळं राज्य म्हटलं जाऊ शकतं.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स