'या' देशात बांधले जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर; 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन, पाहा Photos...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 05:59 PM2023-09-25T17:59:11+5:302023-09-25T18:04:23+5:30

Akshardham temple in US: 183 एकर परिसरात मंदिर उभारण्यासाठी 12 वर्षे लागली.

Akshardham temple in US: सनातन धर्म किती महान आहे, हे त्याच्या जगभरातील लोकप्रियतेवरुन कळून जाते. भारतात सर्वाधिक हिंदू मंदिरे आहेत, पण जगभरातही अनेक ठिकाणी मंदिरे बांधली गेली आहेत.

कंबोडियातील अंगकोर येथे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. आता लवकरच आणखी एका ठिकाणी जगातील दुसरे सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

भारताबाहेर बांधण्यात आलेल्या जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे न्यू जर्सी येथे 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरच्या दक्षिणेस सुमारे 90 किमी अंतरावर किंवा वॉशिंग्टन डीसीच्या उत्तरेस 289 किमी अंतरावर असलेल्या रॉबिन्सविले टाऊनशिपमध्ये स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर बांधले गेले आहे.

भारतीयांसाठी हा अतिशय ऐतिहासिक क्षण असणार आहे. 19व्या शतकातील हिंदू आध्यात्मिक संत भगवान स्वामीनारायण यांचे हे मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य-दिव्य असणार आहे.

उद्घाटनाची तारीख जवळ आल्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. मंदिर बांधण्यासाठी यूएसमधील 12,500 स्वयंसेवकांचा सहभाग होता. मंदिर बांधण्यासाठी 12 वर्षे, म्हणजे 2011-2023 असा कालावधी लागला.

अक्षरधाम मंदिर पौराणिक भारतीय संस्कृतीनुसार 183 एकरवर बांधले गेले आहे. मंदिर संकुलात भारतीय संगीत आणि नृत्य प्रकारांच्या कलाकृतींसह 10,000 शिल्पांचा समावेश आहे.

मंदिरात मुख्य मंदिरासह 12 उप-मंदिरे, 9 शिखरे (शिखरांसारखी रचना) आणि 9 पिरॅमिड असतीत. हे मंदिर पुढील हजार वर्षे टिकेल, अशा पद्धतीने डिझाइन केले आहे. या ऐतिहासिक मंदिराच्या उभारणीसाठी चुनखडी, गुलाबी वाळूचा खडक, संगमरवरी आणि ग्रॅनाइटचा वापर करण्यात आला आहे.