1 / 9जेव्हा जेव्हा जग अस्थिरता, युद्ध, साथीचे आजार अथवा सामाजिक असमतोलाच्या परिस्थितीतून जात असते, तेव्हा-तेव्हा भविष्यासंदर्भात भाष्य करणाऱ्यांकडे अथवा भविष्यासंदर्भात काही भाकीतं वर्तवणाऱ्यांकडे समाजाचे लक्ष वळते. जसे की बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमस. आता याच परंपरेत आणखी एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे, निकोलस औजुला. 2 / 9३८ वर्षीय औजुला हे लंडनचे रहिवासी आहेत. ते एक हिप्नोथेरपिस्ट आणि आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. ते म्हणतात, आपली भाकिते डेटावर आधारित नाहीत, तर आध्यात्मिक अंतर्ज्ञान आणि अंतर्दृष्टीवर आधारित आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक प्रमुख जागतिक घटनांबद्दल त्यांनी केलेल्या अविश्वसनीय आणि अचूक भाकित्यांमुळे ते जगभरात प्रसिद्ध झाले आहेत.3 / 92025 मधील सर्वात मोठी भविष्यवाणी म्हणजे तिसरे महायुद्ध? - निकोलस औजुला यांचे सर्वात धक्कादायक भाकित हे २०२५ च्या मध्यापर्यंत तिसरे महायुद्ध भडकण्याच्या शक्यतेसंदर्भात आहे. त्यांच्या मते, हे युद्ध कोणत्याही राजकीय कारणामुळे अथवा सीमा वादामुळे उद्भवणार नाही. तर जगातील करुणेच्या अभावामुळे उद्भवेल. 4 / 9हे युद्ध धार्मिक आणि राष्ट्रवादी भावनांनी प्रेरित असेल, असे त्यांना वाटते. यापासून ब्रिटनही दूर राहणार नाही, असेही औजुला यांनी म्हटले आहे. सध्याचा रशिया-युक्रेन संघर्ष, पाश्चात्य गटबाजी आणि मध्य आशियातील तणाव सातत्याने वाढत आहेत.5 / 92025 साठी ओजुला यांची धडकी भरवणारी भाकितं - औजुला यांच्या दृष्टीने 2025 मध्ये केवळ युद्धच नाही, तर नैसर्गिक, राजकीय आणि सामाजिक उलथा-पालथही संभवते. त्यांनी वर्तवलेली भाकीतं पुढील प्रमाणे आहेत...6 / 9१. नैसर्गिक आपत्ती - मोठे भूकंप, त्सुनामी आणि हवामानासंदर्भातील आपत्ती. २. महामारी - नवी महामारी, प्रामुख्याने कोविड स्ट्रेनशी संबंधित. ३. आर्थिक संकट - जागतिक महागाईत वेगाने वाढ. ४. ब्रिटेन - कीर स्टारमर सरकारचे पतन.7 / 9५. अमेरिका - डोनाल्ड ट्रम्पचे जोरदार पुनरागमन, पारंपारिक मूल्यांचा उदय. ६. चिकित्सा क्षेत्र - प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेल्या मानवी अवयवांसंदर्भात यश. ७. राजेशाही - प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांच्यातील समेट.8 / 9निकोलस औजुला यांची खरी ठरलेली भाकीतं - औजुला यांची विश्वासार्हता त्यांच्या भूतकाळातील भविष्यवाणीने अधिक बळकट होते. त्यांची भूतकाळातील अेक भाकितं खरी ठरली आहेत. यात, २०१९ मध्ये कोविड-१९ साथीची भविष्यवाणी. नोट्रे-डेम कॅथेड्रलमध्ये आगीच्या घटनेची भविष्यवाणी, जी खरी ठरली. 9 / 9त्यांनी २०२० पूर्वी ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळीचेही संकेत दिले होते. त्यांनी २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प सत्तेत परत येतील अशीही भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली. त्यांनी काही वर्षांपूर्वी एआयच्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) जलद प्रगतीसंदर्भात भाष्य केले होते. या उदाहरणांनी औजुला यांना आधुनिक काळातील भविष्यवेत्ता म्हणून स्थापित केले आहे.