७ वर्षांच्या मुलीने प्रपोज केले, त्यांनी १४ वर्षानंतर तिच्यासोबत लग्न केले; भूतानच्या राजाची अजब प्रेम कहानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:48 IST2025-02-04T17:18:19+5:302025-02-04T17:48:26+5:30

भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक भारतात आले आहेत आणि त्यांनी प्रयागराजमधील संगम नदीच्या काठावर आयोजित महाकुंभमेळ्यात स्नानही केले आहे.

भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक भारतात आले आहेत आणि त्यांनी प्रयागराजमधील संगम नदीच्या काठावर आयोजित महाकुंभमेळ्यात स्नानही केले आहे. भारत आणि परदेशातील अनेक मोठ्या व्यक्ती कुंभमेळ्याला आले आहेत. दरम्यान, आता भूतानच्या राजाची चर्चा होत आहे.

भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या पत्नीचे नाव जेत्सन पेमा वांगचुक आहे. दोघांचाही प्रेमविवाह झाला आहे, त्यांच्या भेटीची गोष्टही रंजक आहे.

राजाची पत्नी जेत्सन पेमा फक्त ७ वर्षांच्या होत्या त्यावेळी एका पिकनिक दरम्यान त्यांची भेट जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्यासोबत झाली. त्यावेळी खेसर १७ वर्षांचे होते. छोटी जेट्सन या राजकुमाराने इतकी प्रभावित झाल्या की त्यांनी राजासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

पुढं १४ वर्षानंतर राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि राणी पेमा त्यांनी लग्न केले.

वर्ष २००८ मध्ये, खेसरच्या वडिलांनी गादी सोडली. जिग्मे खेसर ज्यावेळी भूतानचे राजे झाले त्यावेळी ते फक्त २८ वर्षांचे होते. त्यानंतर ते जगातील सर्वात तरुण शासक बनले. राजे झाल्यानंतर तीन वर्षांनी आणि त्यांच्या पहिल्या भेटीनंतर १४ वर्षांनी, २०११ मध्ये त्यांनी २१ वर्षीय जेत्सन पेमाशी लग्न केले.

लग्नानंतर जेत्सन पेमा जगातील सर्वात तरुण राणी बनल्या. १४ वर्षापूर्वी त्यांनी खेसर यांना आपल्या मनाती गोष्ट सांगितली होती.

राणी जेत्सुन त्यांच्या उत्तम फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जातात. त्यांच्या लग्नाच्या दिवशीही त्यांचा हा साधेपणा स्पष्टपणे दिसून येत होता.

खेसर हे भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक आणि त्यांची तिसरी पत्नी त्शेरिंग यांगदोन यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून परराष्ट्र सेवा कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्या घेतल्या आहेत. पेमा यांनी लंडनच्या रीजंट्स कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी घेतली आहे.

वडिलांप्रमाणेच खेसर हे त्यांच्या मानवतावादी स्वभावासाठी ओळखले जातात. याद्वारे त्यांनी संपूर्ण देशाचे मने जिंकली आहेत.

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भूतानचे पाचवे राजे आहेत. ते वांगचुक कुळाचे प्रमुख आहेत. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९८० रोजी झाला.

टॅग्स :भूतानBhutan