दरवर्षी किती उल्कापिंड पृथ्वीवर धडकतात हे वाचून व्हाल अवाक्, कुठे सर्वात जास्त पडतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 01:36 PM2020-05-30T13:36:34+5:302020-05-30T13:42:34+5:30

याचा खुलासा एका वैज्ञानिकाने केला आहे. त्यांनी अंटार्क्टिकेत केलेल्या रिसर्चमधून हा दावा केला आहे. ते इथे रिसर्च करत असताना त्यांना उल्कापिंडाचा एक तुकडा सापडला.

पृथ्वीवर दरवर्षी 17 हजारांपेक्षा अधिक उल्कापिंड येऊन धडकतात. यातील जास्तीत जास्त उल्कापिंड भूमध्य रेषेच्या जवळील प्रदेशात पडतात. याचा खुलासा एका वैज्ञानिकाने केला आहे. त्यांनी अंटार्क्टिकेत केलेल्या रिसर्चमधून हा दावा केला आहे. ते इथे रिसर्च करत असताना त्यांना उल्कापिंडाचा एक तुकडा सापडला.

जिओफ्री इवाट इंग्लंड युनिव्हर्सिटी ऑफ मॅन्चेस्टरमध्ये अप्लाइड मॅथमॅटेशिअन आहेत. अंटार्क्टिकेच्या प्रवासानंतर ते आणि त्यांचे सहकारी याचा शोध घेण्याकडे वळले की, दरवर्षी पृथ्वीवर किती उल्कापिंड पडतात. तसेच सर्वात जास्त उल्कापिंड कुठे पडतात. (Image Credit : AFP)

जिओफ्री सांगतात की, एप्रिल 1988 पासून मार्च 2020 पर्यंत पृथ्वीवर किती उल्कापिंड पडले आणि या ठिकाणांचा रेकॉर्ड आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि नासा द्वारे तयार करण्यात आलेल्या या नकाशावर सांगण्यात आले आहे की, पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त उल्कापिंडांचा पाऊस पडला. (Image Credit : CALTECH/NASA)

या लोकांना पृथ्वीच्या काही भागांची निवड केली आणि दोन वर्षे अभ्यास केला. हा अभ्यास जास्तकरून उन्हाळ्यात फायदेशीर ठरला. त्यामुळे ते उन्हाळ्यातट पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उल्कापिंड पडण्याचा अभ्यास करत राहिले.

या वर्षी 29 एप्रिलला जिओलॉजी मॅगझीनमध्ये इवाट यांनी नवीन रिपोर्ट प्रकाशित केला. त्यात सांगण्यात आले की, दरवर्षी पृथ्वीवर 17 हजारांपेक्षा जास्त उल्कापिंड पडतात. सर्वात जास्त उल्कापिंड भूमध्य रेषेजवळील प्रदेशात पडतात. (Image Credit : AFP)

जियोफ्री ईटाव सांगतात की, जर तुम्हाला खरंच उल्कापिंडांचे आगीचे गोळे बघायचे असतील तर तुम्हाला भूमध्य रेषेच्या जवळील परिसरात जाऊन रात्र घालवावी लागले. (Image Credit : AFP)

ईटाव सांगतात की, अंटार्क्टिकेत उल्कापिंडांची गिनती इतर ठिकाणांपेक्षा सोपी असते. पण सर्वात जास्त अडचण ही असते की, उल्कापिंड बर्फाच्या आत गेले तर शोधणं अवघड होतं. बर्फही तुटून समुद्रात वाहून जातो.

पृथ्वीच्या चारही बाजूने होणारा उल्कापिंडांचा पाऊस जास्त भूमध्य रेषेजवळ पडतो. इथे त्यांची पडण्याची तीव्रता आणि संख्याही जास्त असते. अनेक तर महासागरात पडतात. त्यामुळे ते मोजने शक्य होत नाही. पण जगभरातील दुर्बीणीने त्यांचे फोटो घेतले जातात.

जिओफ्री सांगतात की, नॉर्वेसारख्य परिसरातही तुम्हाला उल्कापिंडांचा पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच तुम्हाला तेथील नॉर्दन लाइट्सचा सुंदर नजाराही बघायला मिळेल.