आशिया चषक विजेत्या महिला हॉकी संघाचे जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 07:52 PM2017-11-07T19:52:33+5:302017-11-07T19:56:51+5:30

13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे मायदेशात परतल्यानंतर नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.

संघ विमानतळावर येण्याआधीच तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विमानतळाहून बाहेर पडताच समर्थकांनी हार घालून खेळाडूंचं स्वागत केलं.

आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्याची घोषणा हॉकी इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.

रविवारी झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात भारतीय महिलांनी चीनचे कडवे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असे परतावून बाजी मारली.

विशेष म्हणजे २००४ नंतर पहिल्यांदाच आशिया चषक पटकावलेल्या भारतीय महिलांनी पुढील वर्षी रंगणा-या विश्वचषक स्पर्धेसाठीही थेट प्रवेश मिळवला.

संपूर्ण स्पर्धेत दबदबा राखलेल्या भारतीय संघाने एकही सामना न गमावता 28 गोलचा वर्षाव करताना भारतीय महिलांनी 5 गोल स्वीकारले.