तुमच्या डिप्रेशनचं कारण स्मार्टफोन तर नाही ना? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 14:35 IST2018-09-30T14:30:11+5:302018-09-30T14:35:15+5:30

हल्ली बहुतांशी लोक आपला जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनसोबत घालवतात.
जेव्हा एखादी व्यक्ती एकांतात असते त्यावेळी ती विचारात असते. अशावेळी इतर लोकांच्या तुलनेत ती व्यक्ती इमोशनली देखील विक असते.
अशावेळी एखाद्या गोष्टीची सोबत मिळावी म्हणून ती व्यक्ती आपल्या स्मार्टफोनसोबत वेळ घालवते.
अनेक लोक डिप्रेशनमध्ये असताना अनेक व्यसनांच्या आहारी जातात. अशातच डिप्रेशनमध्ये अनेकांना स्मार्टफोनचंही व्यसन लागतं.
रिसर्चमध्ये सांगितल्यानुसार, एखादी व्यक्ती जर इमोशनली विक असेल तर तिला स्मार्टफोनचं व्यसन चटकन लागतं.
एका मर्यादेपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरणं हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या घातक असतं.