World Cancer Day : सावधान ! या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 15:57 IST2019-02-04T15:51:16+5:302019-02-04T15:57:53+5:30

अचानक वजन घटणे
वजन वाढणे तसंच कमी होणे, यावरुन बहुतांश महिला अतिशय चिंतेत येतात. पण अचानक अथवा कारणाशिवायच जर तुमचे वजन घटत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.
थकवा जाणवणे
पुरेसा आराम आणि झोप मिळत असताना दिवसभर थकवा जाणवणे. हे देखील एक कॅन्सर रोगाचे लक्षण असू शकते.
विनाकारण पोट फुगणे
कोणत्याही कारणाविना पोट फुगणे, वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यास वेळीच सावध व्हा. ही लक्षणं ओव्हेरियन आणि युरिटाइन कॅन्सरची असू शकतात.
नाश्त्यात करपलेला ब्रेड खाणे हानिकारक
बहुतांश जणांना सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेड खाणे पसंत असते. अनेकदा ब्रेड भाजताना तो करपतो. करपलेल्या ब्रेडकडे आपण दुर्लक्ष करतो. पण करपलेला ब्रेड खाणे टाळावे, यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आणि जीवघेणा आजार होतो.
ओटी पोट दुखणे
वारंवार होणाऱ्या पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नये. विनाकारण येणारी सूज आणि रक्तस्त्रावामुळे ओटी पोट दुखते. याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करावेत. ही समस्या पुरुष-महिला दोघांनाही होऊ शकते.
कंबरदुखी
कंबरदुखीचा त्रास होत असल्यास हे लक्षण ओव्हेरियन कॅन्सरचे असू शकते.
छातीतील गाठ
ब्रेस्टच्या रंगामध्ये तुम्हाला बदल जाणवल्यास, याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे ब्रेस्ट कॅन्सरचे संकेत आहेत. हे संकेत मिळाल्यास तातडीने तपासणी करुन घ्यावी.
त्वचेवर जखमा होणे
कोणताही मार न लागताच जर तुमच्या अंगावर जखमा दिसत असतील तर डॉक्टरांकडे जा. लाल किंवा काळ्या रंगाचे वेदनादायी चट्टे शरीरावर येत असतील, तर ही लक्षणं त्वचेच्या कॅन्सरशी संबंधित आहेत.
दीर्घकाळ राहणारा ताप
निरोगी राहणारा एखादा व्यक्ती अचानक आजारी पडणे आणि त्याला आलेला ताप दीर्घकाळापर्यंत अंगात राहणे, हे लक्षणदेखील कॅन्सर आजाराशी संबंधीत आहे.