शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Women Health: मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे योग्य की अयोग्य? वाचा डॉक्टरांचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 3:24 PM

1 / 5
मासिक पाळीदरम्यान विश्रांती हवी हे मान्य आहे पण अजिबातच हालचाल करू नये असे कुणीही म्हटलेले नाही. उलट मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे फायदेशीर ठरते. अर्थात इतर दिवसाच्या तुलनेत या दिवसात कठीण व्यायाम प्रकार टाळा असेच सांगितले जाते. हलका व्यायाम सर्वांना शक्य आहे, तरीदेखील प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असल्याने शरीराला अनुकूल गोष्टी करणे योग्य ठरते. अति रक्तस्त्राव होत असल्यास पहिले १-२ दिवस व्यायाम करू नये, त्यानंतर त्यांना आराम मिळेल तेव्हा त्या व्यायाम करू शकतात.
2 / 5
मासिक पाळीचा काळ हा हार्मोनल बदलांच्या दृष्टीने अत्यंत कठीण काळ असतो. या दरम्यान, शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीरात अधिक थकवा येतो. पण जर कोणाला अति प्रमाणात थकवा आणि अशक्तपणा नसेल तर त्यांनी हलका व्यायाम जरूर करावा.
3 / 5
पीरियड्सच्या काळात अनेकदा मूड चिडचिडा होत राहतो. त्या काळात हलकासा व्यायाम केल्याने मन प्रसन्न राहते आणि ते चार दिवस सुसह्य होऊ शकतात. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांत काही लक्षणे समजतात, ज्यात थकवा, चिडचिड, राग इ. याला प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) म्हणतात. ही लक्षणे व्यायामाने कमी करता येतात. ही लक्षणे कमी करण्यासाठी हलका एरोबिक व्यायाम करा.
4 / 5
व्यायामामुळे शरीरातील नैसर्गिक एंडोर्फिन हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे मूड सुधारतो आणि त्या काळात पीएमएसची लक्षणे कमी होऊ शकतात. एंडोर्फिन हे नैसर्गिक वेदना कमी करणारे आहे, जे व्यायामादरम्यान शरीरात स्त्रवते. मासिक पाळी दरम्यान व्यायाम केल्याने या हॉर्मोनचा स्त्राव होतो आणि वेदना कमी होते. शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, जे थेट मेंदूला लक्ष्य करते. यामुळे मन शांत राहते आणि आनंदी वाटू लागते.
5 / 5
मासिक पाळीच्या काळात योगा, वेगवान चालणे, सायकलिंग, पोहणे, नृत्य देखील करू शकता, परंतु त्यांचा कालावधी फक्त ३० मिनिटे ठेवा. याशिवाय, असा व्यायाम करू नका ज्यामध्ये तुमचे पाय पोटाच्या वर जातील, म्हणजेच पाय आणि छातीमध्ये ९० डिग्रीचा कोन नसावा. क्रंच, सिट अप यासारखे व्यायाम करणे टाळा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWomenमहिला