स्वदेशी Covaxin एवढी महागडी कशी? सर्वाधिक किंमत, कारण जाणून घ्या...

Published: June 14, 2021 11:31 AM2021-06-14T11:31:03+5:302021-06-14T11:37:12+5:30

Why Covaxin cost more than other corona vaccine: कोव्हॅक्सिन लस एवढी महाग का? भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही सर्वात महागडी लस ठरली आहे. कोविशिल्डहून दुपटीने कोव्हॅक्सिन लस महाग आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून सर्वांना केंद्र सरकारतर्फे मोफत लस दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, असे असले तरी २५% लसी खासगी रुग्णालयांना थेट लसनिर्मात्यांकडून खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी केंद्राने लसींची किंमतही ठरवून दिली आहे. त्यात कोव्हॅक्सिन ही लस सर्वात महाग ठरली आहे.

तज्ज्ञांच्या मते कोव्हॅक्सिन बनविण्याचे तंत्रज्ञान महाग असल्याने साहजिकच लसीची किंमतही जास्त आहे. (For all its “made in India” pitch, Covaxin is the most expensive Covid-19 vaccine in India)

कोव्हॅक्सिन लस तयार करण्यासाठी एका संपूर्ण निष्क्रिय विषाणूचा वापर केला जातो.

कोरोनाचा संपूर्ण निष्क्रिय केलेला विषाणू वापरून त्यापासून लस तयार करण्यासाठी शेकडो लिटर महागड्या सीरम आयात कराव्या लागतात

अत्युच्च सुरक्षित अशा जैवसुरक्षा प्रयोगशाळांमध्ये काळजीपूर्वक पद्धतीने या सीरम्समध्ये विषाणूची वाढ केली जाते. त्यानंतर विषाणू निष्क्रिय केला जातो.

इतर लसींच्या तुलनेत संपूर्ण प्रक्रिया महागडी असल्याने भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेली कोव्हॅक्सिन लस महाग ठरते.

कोव्हॅक्सिनप्रमाणे या लसी तयार करण्यासाठी महागड्या तंत्रज्ञानाची आवश्यकता भासत नाही.

या दोन्ही लसी एमआरएनए तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात येत असल्याने त्यांच्यासाठी मोठ्या यंत्रणेची गरज नसते. या तंत्रज्ञानात प्रत्यक्ष कोरोना विषाणूचा वापर केला जात नाही.

लसीच्या किंमत निश्चितीत कच्चा माल, पॅकेजिंग, लस तयार करण्याची प्रक्रिया, तिची देखभाल, परवाना, वैद्यकीय चाचण्या, उत्पादनाचा खर्च इत्यादी घटकांचा समावेश असतो.

भारतीय लस उत्पादक प्रतिडोस ३ ते ४ रुपये फायदा कमावतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही सर्वात महागडी लस ठरली आहे. कोविशिल्डहून दुपटीने कोव्हॅक्सिन लस महाग आहे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English