Coronavirus : वॅक्सीनने एकदा शरीरात तयार झालेल्या Antibodies आयुष्यभर कोरोनापासून वाचवणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 10:58 AM2020-07-23T10:58:20+5:302020-07-23T11:18:23+5:30

अ‍ॅंटीबॉडीज आणि टी-सेल्समध्ये फरक - सर्वातआधी तर तुम्हाल अ‍ॅंटीबॉडीज आणि टी-सेल्समधील अंतर समजून घ्यायला हवं.

कोरोना व्हायरसबाबत आतापर्यंत असं मानलं जात होतं की, जी व्यक्ती एकदा या व्हायरसने संक्रमित झाली तर पुन्हा त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची भीती राहणार नाही. सोबतच काही कारणाने या व्हायरसने व्यक्तीच्या शरीरावर ताबा मिळवला तरी ती व्यक्ती फार हलकी लक्षणांसोबत बरी होईल. पण जसजशी या व्हायरससंबंधी नवनवीन माहिती समोर येत आहे, प्राथमिक सूचनांमध्ये बदल होत आहेत.

अ‍ॅंटीबॉडीज आणि टी-सेल्समध्ये फरक - सर्वातआधी तर तुम्हाल अ‍ॅंटीबॉडीज आणि टी-सेल्समधील अंतर समजून घ्यायला हवं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना व्हायरस प्रवेश करतो तेव्हा त्याच्या शरीरात असलेल्या टी-सेल्स म्हणजे व्हाइट ब्लड सेल्स त्या व्हायरसला मारण्याचं आणि शरीराच्या त्या भागापर्यंत सीमित ठेवण्याचं काम करतात.

इतक्या वेळात शरीरात इम्यून सिस्टीम त्या व्हायरसला स्कॅन करून त्याच्या विरोधात अ‍ॅंटीबॉडीजचं निर्माण करतं. या अ‍ॅंटीबॉडीज कोशिका असतात ज्या आपल्या रक्तात मिश्रित होतात आणि व्हायरसवर अटॅक करून त्याला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम करतात.

त्यानंतर टी-सेल्स त्या सेल्सना नष्ट करतात ज्यांना व्हायरसने संक्रमिक केलं असतं. जेणेकरून हे संक्रमण शरीराच्या दुसऱ्या भागात पसरू नये आणि व्हायरसला पुन्हा वाढण्याची संधी मिळू नये.

वॅक्सीनची भूमिका काय असेल? - वैज्ञानिक कोरोना विरोधात जी वॅक्सीन तयार करण्यात बिझी आहे. ती वॅक्सीन व्यक्तीच्या शरीरात जाऊन अ‍ॅंटीबॉडीज लगेच जास्त प्रमाणात अ‍ॅक्टिव करतं. याने व्हायरस लवकर मरतो. सोबतच ही त्या लोकांसाठी अधिक प्रभावी असते ज्यांच्या शरीरात व्हायरसने प्रवेश केला आणि शरीर कमजोर केलंय.

कारण व्हायरस सर्वातआधी मनुष्याच्या रोगप्रतिकारकशक्तीवर अटॅक करतो. ज्याने शरीरात अ‍ॅंटीबॉडीज तयार होण्याची प्रक्रिया हळूवार होते आणि व्हायरस वेगाने वाढतो. वॅक्सीन या व्हायरसची वाढण्याची गती रोखून शरीरात पुन्हा अ‍ॅंटीबॉडीज तयार करण्याची प्रक्रिया वाढवणार आहे.

वॅक्सीनबाबत संशय - आता प्रश्न हा उपस्थित होतो की, वॅक्सीनसंबंधी या गोष्टीवर संशय का घेतला जात आहे की, वॅक्सीन घेतल्यावरही कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं? याचं उत्तर हे आहे की, आपल्या शरीरात व्हायरस विरोधात तयार होणाऱ्या अ‍ॅंटीबॉडीजचं लाइफ जास्त मोठं नसतं.

या अ‍ॅंटीबॉडीज काही महिन्यात शरीरातून गायब होतात. पण वॅक्सीन लावण्याची चांगली बाब ही आहे की, आपल्या इम्यून सिस्टीमच्या आत वॅक्सीनची स्कॅन कॉपी सेव्ह राहते. जेव्हाही हा व्हायरस कुणाच्या शरीरात अटॅक करतो, तेव्हा इम्यून सिस्टीम जराही उशीर न करता वेगाने अ‍ॅंटीबॉडीज तयार करतं.

शरीराला किती काळ वाचवेल अ‍ॅंटीबॉडीज - याने पुन्हा व्यक्तीला कोरोना संक्रमण झालं तर त्याचं शरीर व्हायरससोबत लढण्यासाठी आधीपेक्षा अधिक तयार राहिल. याबाबत यूनायटेड स्टेटच्या वेंडरबिल्ट यूनिव्हर्सिटीशी संबंधित संक्रमित रोग तज्ज्ञ डॉक्टर Dr Buddy Creech यांनी सांगितले की, नव्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, कोविड-१९ विरोधात तयार होणाऱ्या अ‍ॅंटीबॉडीजपैकी साधारण अर्ध्या अ‍ॅंटीबॉडीज ७३ दिवसात नष्ट होतात.

पण याचा अर्थ असा अजिबात नाही की, या व्हायरसपासून बचावासाठी लावण्यात आलेली वॅक्सीन पूर्णपणे व्यर्थ झाली. कारण पुढील काही महिन्याच्या आत जर हा व्हायरस व्यक्तीवर पुन्हा अटॅक करेल तर अशा स्थितीत फारच हलक्या लक्षणांसोबत ती व्यक्ती बरी होईल. कारण या स्थितीत व्यक्तीचं शरीर या व्हायरसला जास्त दिवस जिवंत राहू देणार नाही.

Read in English