वजन कमी करायची 'ही' सर्वात सोपी पद्धत; नितिन गडकरींनी कमी केलं 45 किलो वजन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 08:06 PM2022-12-13T20:06:19+5:302022-12-13T20:11:20+5:30

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याच सूत्राचा अवलंब करून आपले वजन 135 किलोवरून 89 किलोपर्यंत कमी केले आहे.

वजन कमी करायचा विषय निघाला, की आता खाणेपिणे बंद करावे लागणार, बोअरिंग अन्न खावे लागणार आणि प्रचंड वर्कआऊट करावे लागणार, असे अनेकांना वाटते. लोक आपल्याला वजन कमी करण्याचे अथवा नियंत्रित करण्याच्या अनेक पद्धती सांगतील. मात्र, कोणाला काय सूट करेल, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

खरे तर, आपण जेवढ्या कॅलरीज पचवू शकतो, त्याहून अधिक घेतल्या तर वजन वाढेल. यामुळे, वजन कमी करायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, कॅलरीज काउंट कमी करणे. हे ठरवल्यानंतर आपण हवे ते खाऊ शकता. केवळ प्रमाण कमी करावे लागेल.

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याच सूत्राचा अवलंब करून आपले वजन 135 किलोवरून 89 किलोपर्यंत कमी केले आहे. गडकरी यांनी सांगितले, की ते खाण्याचे प्रचंड शौकीन आहेत आणि त्यांनी त्यांचे वजन तब्बल 45 किलोने कमी केले आहे.

आपण फीट रहावे, असे प्रत्येकालाच वाटते. पण यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, ते अनेक लोक करत नाहीत. लोकांना वजन कमी करणे हे मोठे आव्हान वाटते. पण, थोडी काळजी घेतली, तर ते सहज शक्य आहे. शिवाय ते नियंत्रणातही ठेवता येऊ शकते.

गडकरींनी सांगितलं कसं कमी केलं वजन - भाजप नेते नितिन गडकरी यांनी तब्बल 45 किलो वजन कमी केले आहे. यासाठी काय केले, हे त्यांनी 'आजतक'वरील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. ते म्हणाले, मी आजही सर्व काही खातो, पण प्रमाण कमी केले आहे.

प्राणायाम मिस करत नाही - ते पुढे म्हणाले, त्यांचे वजन 135 किलो होते. ते आता 89 किलोवर आले आहे. गडकरी यांनी सांगितले, की ते सव्वा तास एक्सरसाईज आणि प्राणायाम करतात. ते कुठल्याही परिस्थितीत प्राणायाम मिस करत नाहीत. यामुळे त्यांची इम्युनिटीही चांगली झाली आहे. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी सर्वांनाच आपल्या तब्येतीकडे नियमित लक्ष देण्याचा सल्ला दिला. तसेच हेल्थ ही प्रायॉरिटी असायला हवी, असेही ते म्हणाले.