ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर!

Published:October 31, 2024 01:13 PM2024-10-31T13:13:00+5:302024-10-31T13:27:33+5:30

How to Wear Dupatta & Draping Styles : 7 News Ways of Draping a Dupatta on heavy dresses : How to Wear Dupatta : ड्रेसवर ओढणी घेण्याच्या नवीन पद्धती, नेहमीची तीच ती कॉमन पद्धत फॉलो करण्यापेक्षा फॉलो करा नवीन ट्रेंड...

ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर!

सणावाराला आपण नवीन वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेसेस किंवा पंजाबी सूट, कुर्ती घेतो. यावर मॅचिंग ओढणी अगदी शोभून दिसते. पंजाबी सूट, ड्रेसवर ओढणी घेतल्याने आपला लूक पूर्ण होतो. दोन्ही खांद्यांवरुन ओढणी घेण्याची एक कॉमन पद्धत आपल्याला माहित असेलच. पण या दिवाळीत तीच ती नेहमीची कॉमन पद्धत फॉलो न करता ड्रेसच्या पॅटर्ननुसार वेगवेगळ्या पद्धतीने ओढणी कशी घेता येईल ते पाहूयात.

ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर!

१. दिवाळीसाठी जर आपण नवीन ड्रेस किंवा पंजाबी सूट खरेदी केला असेल तर त्यावर ओढणी घेण्याच्या वेगवेगळ्या नवीन पद्धती आपण ट्राय करु शकता. यामुळे आपला ड्रेस देखील सुंदर दिसेल तसेच लूकही छान येईल. त्यामुळे कोणत्या पॅटर्नच्या ड्रेसवर कोणत्या प्रकारे ओढणी घ्यावी ते पाहूयात.

ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर!

२. काहीवेळा आपल्या ड्रेसवर हेव्ही वर्क, डिझाइन्स किंवा सुंदर असे धागा वर्क, नाजूक धाग्यांचे नक्षीकाम केलेले असते. परंतु ओढणी घेण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हे वर्क काहीवेळ लपून जाते. विशेषतः नेकपटर्न जवळील वर्क ओढणी घेतल्याने लपून जाते असे होऊ नये म्हणून ओढणी कशी घ्यावी ते पाहूयात.

ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर!

३. जर तुमच्या ड्रेसच्या नेकपटर्नला हेव्ही वर्क केले असेल तर ओढणी गळ्याभोवती न घेता दोन्ही हातांवर घ्यावी. यासाठी ओढणी पाठीमागे घेऊन ती कमरेजवळ आणावी. आणि दोन्ही हातांवरुन ओढणी घेऊन ती पुढे सोडून सोडावी. यामुळे गळ्याभोवती असणारे हेव्ही नेकपटर्न ओढणीमुळे लपणार नाही.

ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर!

४. जर तुमचा ड्रेस संपूर्णपणे प्रिंटेड असेल आणि ओढणी प्लेन असेल तर आपली ओढणी अशा पद्धतीने गळयाभोवती ड्रेप करून घेऊ शकता.

ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर!

५. ड्रेस संपूर्णपणे प्लेन असेल आणि ओढणीवर थोडे हेव्ही वर्क किंवा डिझाइन्स असतील किंवा ओढणीच्या कडेवर चारही बाजुंनी लेस लावली असेल तर आपण ओढणीवरील हेव्ही वर्क दिसावे यासाठी एका खांद्यावर ओढणी घेऊन मोकळी सोडू शकता.

ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर!

६. ड्रेसच्या गळयाभोवती हेव्ही वर्क केले असून गळा व्ही नेकचा असेल तर ओढणी पाठीवरुन गुंडाळून घेऊन खांद्यांवरुन पुढे आणून सोडावी. यामुळे आपला व्ही नेक असलेला नेकपटर्न अगदी उठून दिसेल.

ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर!

७. जर तुम्ही अनारलाकी पॅटर्नचा घेरदार ड्रेस घातला असेल तर त्यावर ओढणी घेताना एका खांद्यावर ओढणी घेऊन दुसऱ्या बाजूने दोन्ही दुसऱ्या हातावर सोडावी. यामुळे तुमच्या अनारकली ड्रेसला खूप छान लूक येईल.