तुमची 'ही' चूक ठरते तुमच्या डोकेदुखीचं कारण, हे पदार्थ टाळाल तर होईल समस्या लगेच दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 10:04 AM2020-02-25T10:04:26+5:302020-02-25T10:14:45+5:30

डोकेदुखीचं नेमकं कारण अनेकांना माहीत असतं. अनेकदा आपल्या चुकांमुळेच डोकेदुखीची समस्या होत असते.

डोकेदुखी ही एक अशी कॉमन समस्या आहे जी प्रत्येकालाच होत असते. ही समस्या जरी सामान्य असली तरी तेवढ्या वेळात कशातच काही लक्ष लागत नाही. पण डोकेदुखीचं नेमकं कारण अनेकांना माहीत असतं. अनेकदा आपल्या चुकांमुळेच डोकेदुखीची समस्या होत असते.

म्हणजे आता तुम्हाला पोटदुखीची समस्या होण्याला कोणते पदार्थ कारणीभूत ठरतात हे माहीत असेलच. पण काही पदार्थ डोकेदुखीलाही कारणीभूत ठरतात हे माहीत नसेल. आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीचं कारण ठरणारे काही पदार्थ सांगणार आहोत.

कॅफीन - फार जास्त कॅफीनचं सेवन केल्याने किंवा अचानक कॅफीनचं सेवन पूर्णपणे बंद केल्याने तुम्हाला डोकेदुखीची समस्या होऊ शकते. यावेळी जोरात वेदना होतात. कॉफी, चहा, चॉकलेट्स हे काही असे पदार्थ आहेत ज्यांचं जास्त सेवन केलं तर यातील कॅफीनमुळे डोकेदुखी होऊ शकते.

आर्टिफिशिअल स्वीटनर - आर्टिफिशिअल स्वीटनर आणि शुगर सब्स्टिट्यूट म्हणून वापरले जाणारे पदार्थ जसे की, सुक्रोलोज, सॅकरीन, ऐसपटॅंम, एससल्फेम इत्यादीचा वापर नेहमीच खाण्या-पिण्याचे पदार्थ गोड करण्यासाठी केला जातो. डायबिटीसचे रूग्ण देखील नेहमीच शुगरला पर्याय म्हणून या स्वीटनर्सचा वापर करतात. पण अनेकांना याच्या सेवनाने डोकेदुखीची समस्या होते.

अल्कोहोल - अल्कोहोल हे त्या कॉमन ड्रिंकपैकी एक आहे ज्यांनी डोकेदुखीची समस्या होते. अल्कोहोलचं अधिक सेवन केल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते आणि यामुळेच आपल्याला डोकेदुखी होऊ शकते. तसेच रेड वाईन आणि बीअर पिणाऱ्या २५ टक्के लोकांना डोकेदुखी होऊ शकते.

चॉकलेट्स - चॉकलेटचं नाव वाचून तुम्हाला भलेही धक्का बसला असेल, पण चॉकलेट खाल्ल्यानेही डोकेदुखी होऊ शकते. बऱ्याच चॉकलेटमध्ये कोकोचं प्रमाण जास्त असतं आणि सोबतच यात टायरामीन आणि कॅफीनसारखे केमिकल्सही असतात. या पदार्थांनी मायग्रेनने पीडित लोकांना डोकेदुखी होते.

जुने पदार्थ - फेटा चीज, ब्लू चीज आणि पार्मेजान चीज हे असे पदार्थ आहेत जे फार जुने असतात. या पदार्थांमध्ये टायरामीन नावाचं केमिक्ल असतं आणि या केमिकलचा मायग्रेन आणि डोकेदुखीशी संबंध आहे. टायरामीन तेव्हा तयार होतं जेव्हा फूड आयटम जुने झाल्यावर प्रोटीनचं ब्रेकडाउन होऊ लागतं. चीज जेवढं जास्त जुनं असेल तेवढं जास्त टायरामीन त्यात असतं.

आइस्क्रीम किंवा फ्रोजन फूड- तुमची फेव्हरेट आइस्क्रीमही तुम्हाला डोकेदुखी होऊ शकतं. आइस्क्रीम थंड असते त्यामुळे त्याचं फार थंड तापमान, ब्रेनमध्ये होणारा ब्लड फ्लोसोबत हस्तक्षेप करत असतो. अनेकदा ब्लड वेसल्समध्येही सूज येते ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.

शेंगदाणे - चीजप्रमाणे तुमचं फेव्हरेट असलेल्या शेंगदाण्यात टायरामीन नावाच केमिकल आढळतं. जे डोकेदुखीचं कारण ठरू शकतं. अशात जर तुम्ही फार जास्त शेंगदाणे खात असाल तर ही सवय टाळावी.

​msg असलेले फूड्स - ज्या पदार्थांमध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट टाकलेलं असतं ते खाणं तसं तर सेफ मानलं जातं. पण अनेक रिसर्चमधून हे सांगण्यात आलं आहे की, एमएसजी आणि मायग्रेनमध्ये लिंक आहे.

फार जास्त मीठ असलेले - मिठाचं प्रमाण अधिक असलेले किंवा प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने शरीरातील सोडिअमचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि आपल्याला डोकेदुखी होऊ लागते.