हिमोग्लोबिन कमी झालंय?, 'ही' फळं खाणं ठरेल फायदेशीर; काही दिवसातच दिसेल फरक By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 04:01 PM 2024-08-01T16:01:36+5:30 2024-08-01T16:27:39+5:30
शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण काही खास फळांचा आहारात समावेश करू शकतो. अशाच काही फळांबद्दल जाणून घेऊया... आपल्या शरीरातील पेशींना ऑक्सिजन पोहोचवण्यात हिमोग्लोबिन महत्त्वाची भूमिका बजावतं. त्याच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
शरीरामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण काही खास फळांचा आहारात समावेश करू शकतो. अशाच काही फळांबद्दल जाणून घेऊया...
डाळिंब डाळिंबामध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. आयर्न हे हिमोग्लोबिनमधील मुख्य घटक आहे.
सफरचंद सफरचंदातही आयर्न आढळतं. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
संत्र संत्री व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतं.
द्राक्ष द्राक्षांमध्ये आयर्नबरोबरच कॉपरही आढळते. हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्येही कॉपरची भूमिका महत्त्वाची असते.
किवी किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सही आढळतात.
चेरी चेरीमध्ये आयर्न आणि कॉपर दोन्ही आढळतात. हे दोन्ही हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात.
बोरं बोरांमध्ये आयर्नसोबतच व्हिटॅमिन सी देखील आढळतं. हे दोन्हीही हिमोग्लोबिनसाठी फायदेशीर आहे.
या फळांचा आहारात समावेश करण्यासोबतच संतुलित आहार घेणंही खूप गरजंचे आहे. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.