हे 5 खाद्य पदार्थ तुमच्या शरीरातील हाडे कमकुवत करतात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:11 PM2019-05-06T12:11:35+5:302019-05-06T12:15:14+5:30

हाडे हे शरीराचा महत्त्वपूर्ण घटक असतो. चांगल्या आरोग्यासाठी हाडे मजबुत असणं गरजेचे असते. मानवी शरीरात 206 हाडांचा वेगगेगळ्या कामांसाठी उपयोग होतो. हाडे मजबुत असतील तर तुम्ही शरीराची हालचाल करु शकाल. हाडांना कॅल्शियमसोबत मिनरल्सदेखील उपयुक्त ठरते.

शरीरातील हाडे आणि मांसपेशी मजबुत ठेवण्यासाठी फक्त कॅल्शियमयुक्त खाद्य खाणे उपयोगी नाही तर असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियम कमी होते. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील हाडांमधील कॅल्शियम कमी होते.

कोल्ड ड्रिंक्स आणि चॉकलेट - कोल्ड ड्रिंक्समध्ये कार्बन डाय ऑक्साईड आणि फॉस्फोरसचं प्रमाण जास्त असल्याने तुमच्या शरीरातील हाडे कमकुवत होतात. त्याचसोबत जास्त प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यानेही हाडे कमजोर होतात. चॉकलेट खाल्ल्याने शरीरात साखर आणि ऑक्सलेटचं प्रमाण वाढतं.

मीठ आणि दारू - दारुचे पिल्यानेही मानवी शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होत असतात. त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानेही शरीरातील हाडे कमजोर होतात. मीठामध्ये सोडियम असतं ते शरीरातील कॅल्शियम मानवी मूत्रांसोबत बाहेर फेकण्यासाठी मदत करतं.

चहा आणि कॉफी - या पदार्थाच्या सेवनानेही शरीरातील हाडे कमकुवत होतात. चहा आणि कॉफी अधिक प्रमाणात पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

पालक - हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असलं तरी पालकमध्ये ऑक्सालेट्सचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे कॅल्शियम कमी होतं. त्यामुळे पालक सारख्या भाज्या जास्त प्रमाणात खाऊ नये

वीट ब्रेड आणि दुध - वीट ब्रेड आणि दुध एकत्र खाल्ल्यानेही शरीरातील कॅल्शियम कमी होते. कॅल्शियम वाढवण्यासाठी अनेक आर्युवेदीक औषधंही वापरली जातात.