शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जास्त थंड पाणी प्यायल्याने होतात 'या' आरोग्याच्या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 5:04 PM

1 / 7
सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. उन्हाच्या झळांमुळे अक्षरश: काहिली होत आहे. ऑफिस, शाळा, कॉलेजमधून घरी आलो की, तहान लागल्याने आपण पहिल्यांदा फ्रिज उघडतो अन् काही क्षणांतच पाण्याची संपूर्ण बॉटल रिकामी करतो. पण, तुम्हाला माहित आहे का? फ्रिजमधील पाण्याचे किंवा बर्फाचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात. अनेकांना फ्रिजमधील पाणी पिणं किंवा बर्फ खाणं खूप आवडतं. तुम्हाला जर बर्फाचे पाणी पिण्याची सवय असेल तर ती सवय प्रथम सोडायला हवी. अन्यथा, शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला फ्रिजमधील थंड पाणी न पिण्यामागची कारणं, दुष्परिणाम काय आहेत ते सांगणार आहोत.
2 / 7
थंड पाणी प्यायल्याने शरीरात तयार होणाऱ्या पाचन रसाचं तापमानही कमी होतं. त्यामुळे पचनक्रिया योग्यप्रकारे होण्यास अडचण येते. तसेच थंड पाणी प्यायल्याने पोटाच्या आतड्याही आकुंचन पावतात. हे पोटाच्या वेगवेगळ्या समस्या होण्याचं मुख्य कारण असू शकतं. ज्या लोकांना पोटाच्या समस्या नेहमी होतात त्यांनी थंड पिणं टाळावं.
3 / 7
काही लोकांना सवय असते की, जेवण केल्यावर ते लगेच थंड पाणी पितात. पण ही सवय तुमच्या हृदयासाठी हानिकारक होऊ शकते. हार्ट अटॅक आणि पाण्याचा जवळचा संबंध आहे. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, जेवण केल्यावर थंड पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या एका समूहाने चीन आणि जपानमधील लोकांवर हा रिसर्च केला होता. चीन आणि जपानमधील लोक जेवण केल्यावर थंड पाणी पित नाहीत. हे लोक जेवण केल्यावर गरम चहा घेतात. अभ्यासकांना आढळलं की, या लोकांमध्ये हार्ट अटॅकची समस्या फारच कमी आहे.
4 / 7
जेव्हा तुम्ही फ्रिजमधील थंड पाणी पिता तेव्हा तुमच्या श्वसनमार्गामधील श्लेष्मल थराचा भाग वाढतो. या भागातील श्लेष्मल थरामुळे श्वसनमार्ग संवेदनशील होतो. ज्यामुळे विविध इनफेक्शन होऊन घसा खवखवण्याची शक्यता देखील वाढू शकते.
5 / 7
शरीराचे तापमान साधारणपणे ३७ अंश सेल्सिअस असते. पण जेव्हा तुम्ही कमी तापमान असलेले पेय पिता तेव्हा तुमच्या शरीराला बदललेले तापमान संतुलित करण्यासाठी उर्जा खर्च करावी लागते.अन्नाचे पचन करणे,पोषणमुल्ये शोषून घेणे यासाठी वापरण्यात येणारी उर्जा तापमान संतुलित करण्यासाठी वापरल्यामुळे शरीराला पोषणमुल्ये कमी प्रमाणात मिळतात.
6 / 7
जर तुम्हाला असं वाटत असेल की, उन्हातून आल्यानंतर थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला एनर्जी मिळू शकेल तर हा तुमचा गैरसमज आहे. खरं तर थंड पाणी शरीरातील एनर्जी शोषून घेतो. थंड पाणी शरीराचं मेटाबॉलिज्मचा स्पीड कमी करतं, ज्यामुळे सुस्ती येते. त्यामुळे जास्त थंड पाणी पिणं शक्यतो टाळा. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी नारळाचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.
7 / 7
टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स