रेल्वेप्रवासादरम्यान कोरोना विषाणू कितपत धोकादायक ठरणार? जाणून घ्या तज्ज्ञाचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 04:01 PM2020-08-03T16:01:49+5:302020-08-03T16:16:34+5:30

कोरोनाच्या माहामारीत आता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली आहे. सण उत्सव लक्षात घेता अनेक स्पेशल ट्रेन्स सोडण्यात आल्या आहेत. हळूहळू सामान्य प्रवाश्यांसाठीही ट्रेन सुरू करण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे.

लांबचा रेल्वे प्रवास असो किंवा जवळचा कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता प्रवासादरम्यान जास्त असते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेनमध्ये ८ फुटांपर्यंत कोरोना विषाणूंचा धोका असतो.

अनलॉकनंतर हा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात कोरोना व्हायरसचा धोका रेल्वेप्रवासादरम्यान किती अंतरावर असू शकतो हे पाहण्यात आले. यावेळी दोन वेगवेगळ्या गोष्टींवर अभ्यास करण्यात आला.

सीटवर बसलेल्या प्रवाश्यांच्या आजूबाजूच्या सीटवरील प्रवाश्यांना संक्रमणाचा धोका ०.३२ टक्के असतो. आजारी व्यक्ती सीटवर बसला असेल तर संक्रमणाचा धोका ३.५ टक्क्यांनी वाढतो.

या अभ्यासातून दिसून आलं की जर सीटवर संक्रमित व्यक्ती आणि निरोगी व्यक्ती दोन्ही एकत्र बसले असतील तर सगळयात जास्त संक्रमणाचा धोका असतो. याशिवाय इतर रांगेतील लोकांना संक्रमणाचा धोका १.५ टक्क्यांपर्यंत असतो.

चीनमध्ये लॉकडाऊन उठवल्यानंतर हाय स्पीड ट्रेनमध्ये हे संशोधन करण्यात आलं होतं.

चाइनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंड प्रिवेंशन यासह चाइनीज एकेडमी ऑफ साइंस यांनी हे संशोधन केले होते. मास्कचा वापर न करणं, हातांनी तोंडाला स्पर्श करणं यामुळे संक्रमणाचा धोका वाढू शकतो.

रेल्वेप्रवासादरम्यान ८ फुटांपर्यंत सोशल डिस्टेंसिंग पाळलं जात नाही तोपर्यंत निरोगी व्यक्तींपर्यंत संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो.

Read in English