"चहा-कॉफी-ग्रीन टी प्यायल्याने शरीर होणार मजबूत"; जाणून घ्या, किती कप पिणं ठरतं फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 05:58 PM2023-11-02T17:58:09+5:302023-11-02T18:07:32+5:30

रोजचा एक कप चहा किंवा कॉफी म्हातारपणातही शरीर मजबूत ठेवते, हे नुकत्याच झालेल्या संशोधनात सिद्ध झालं आहे.

रोजचा एक कप चहा किंवा कॉफी म्हातारपणातही शरीर मजबूत ठेवते, हे नुकत्याच झालेल्या संशोधनात सिद्ध झालं आहे. संशोधकांचे म्हणणं आहे की जर कोणी त्यांच्या मिड लाईफमध्ये (40 ते 60 वर्षे) कॉफी, चहा प्यायला असेल तर त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत त्याचं शरीर कमकुवत होण्याची शक्यता कमी असू शकते.

याचे मुख्य कारण म्हणजे चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅफिन. जे लोक दिवसातून चार कप कॉफी पितात त्यांना चांगले परिणाम मिळाले आणि ज्या लोकांनी ब्लॅक किंवा ग्रीन टीला अधिक प्राधान्य दिलं त्यांच्यावर देखील चांगले परिणाम दिसले.

सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या टीमने 45 ते 74 वयोगटातील 12,000 लोकांचा 20 वर्षे फॉलोअप घेतला. विद्यापीठाच्या योंग लू लिन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये हेल्दी लाँगेव्हिटी ट्रान्सलेशनल रिसर्च प्रोग्रामचे प्राध्यापक कोह वून पुए यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कॉफी आणि चहा ही सिंगापूरसह जगभरातील अनेक प्रदेशांमध्ये मुख्य पेये आहेत. आमच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, मिडलाईफमध्ये त्यांचा वापर वाढतो. असं केल्याने आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत शरीर कमकुवत होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

प्रोफेसर कोह वून पुए पुढे म्हणाले, या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी आणि कॅफीन किंवा इतर रासायनिक संयुगांमुळे शारीरिक कमकुवततेवर हे परिणाम होत आहेत का याचा तपास करण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे.

सरासरी 53 वर्षे वय असलेल्या लोकांशी संवाद साधण्यात आला आणि त्यांना कॉफी, चहा, कोल्ड्रिंक्स आणि चॉकलेट यांसारख्या कॅफिनयुक्त पेये खाण्याच्या आणि पिण्याच्या त्यांच्या सवयींबद्दल विचारण्यात आले.

संशोधनात सहभागी असलेल्या लोकांना, ज्यांचे सरासरी वय 73 वर्षे होते, त्यांना त्यांचे वजन आणि एनर्जी लेव्हलबद्दल विचारण्यात आलं. त्याची हँडग्रिप पॉवर आणि टाईम अप अँड गो (TUG) ही त्याची ताकद शोधण्यासाठी चाचणी घेतली.

12 हजार लोकांपैकी दोन तृतीयांश (68.5 टक्के) पेक्षा जास्त लोक दररोज कॉफी पितात असे आढळून आले. या गटातील 52.9 टक्के लोकांनी दिवसातून एक कप कॉफी प्यायली, 42.2 टक्के लोकांनी दररोज दोन ते तीन कप कॉफी प्यायली आणि उर्वरित लोक दररोज चार किंवा त्याहून अधिक कप कॉफी प्यायले.

चहा पिणार्‍यांचे त्यांच्या चहा पिण्याच्या सवयीनुसार वर्गीकरण करण्यात आले. या आधारे, त्याची 4 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली ज्यामध्ये कधीही न पिणारे, महिन्यातून किमान एकदा पिणारे, आठवड्यातून किमान एकदा पिणारे आणि दररोज पिणारे यांचा समावेश आहे.

संशोधनाच्या निकालांवरून असे दिसून आले आहे की मध्यम वयात कॉफी, ब्लॅक टी किंवा ग्रीन टी पिण्याने दररोज चार किंवा त्याहून अधिक कप कॉफी पिणाऱ्यांमध्ये शारीरिक दुर्बलतेची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.

रोज कॉफी न पिणाऱ्या लोकांपेक्षा हे लोक शारीरिकदृष्ट्या अशक्त असण्याची शक्यता खूपच कमी होती. जे लोक दररोज ब्लॅक किंवा ग्रीन टी पितात त्यांना चहा न पिणाऱ्यांपेक्षा शारिरीक दुर्बलता येण्याची शक्यता खूपच कमी होती.

अमेरिकन मेडिकल डायरेक्टर्स असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, कॅफीनचा स्रोत काहीही असो, जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्याने शरीर कमकुवत होण्याची शक्यता कमी करतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.