जिमला जाऊन 'या' चुका कराल तर बॉडी बनणार नाही पण बोंबलत बसाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 05:08 PM2020-02-26T17:08:34+5:302020-02-26T17:37:56+5:30

अनेकजण आपलं वजन कमी करण्यासाठी जिमला जात असतात. प्रयत्न करून सुद्धा वजन कमी होत नाही. कारण काही चुका तुम्ही वारंवार करत असता. आज आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या कोणत्या चुकांमुळे जिमला जाऊन सुद्धा काही उपयोग होत नाही.

व्यायाम केल्यानंतर अर्ध्या तासाच्या खाणं गरचेचं असतं. पण काहीजण लगेच योग्य आहार घेत नाहीत. त्यामुळे त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो.

वर्कआऊट केल्यानंतर खूप लोकांना थकल्यासारखं वाटत असतं. त्यामुळे सोफ्यावर बसणं, झोपणं अशा अनेक कृती केल्या जातात. पण असं करणं खूप चुकिचं आहे. असं न करता तुम्ही व्यायाम केल्यानंतर काही वेळ शरीर एक्टिव्ह ठेवा.

वर्कआऊटनंतर स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. कारण व्यायाम केल्यामुळे हातपाय दुखत असतात स्ट्रेचिंग केल्यामुळे स्नायुंना आराम मिळतो.

जिमला तुम्ही वेगवेगळ्या मशिन्सचा हात लावत असता. व्हायरल इन्फेक्शन किंवा त्वचेचे विकार होण्याचा धोका असतो त्यामुळे स्वच्छता पाळा.

शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी जिमवरून आल्यानंतर अंघोळ करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला आरोग्यासंबंधी आजार होण्याची शक्यता असते.

व्यायाम केल्यानंतर जास्तीत जास्त पाणी प्या. कारण शरीराला घाम आल्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

जिमला जाऊन आल्यानंतर खूश राहण्याचा प्रयत्न करा. कारण ताण-तणावात जर तुम्ही असाल तर तुमची शारीरिक क्षमता कमी होत असते. त्यामुळे तुमच्या फ्रेंड्सशी बोलून किंवा घरच्यांना वेळ देऊन खूश राहण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तसंच निरोगी राहायतचं असेल तर व्यायाम करताना या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे.