लाँग कोविडमधून बरे झालेले ७० टक्के लोक 'या' समस्येचा करताहेत सामना; AIIMS चा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:42 IST2024-12-06T16:32:55+5:302024-12-06T16:42:44+5:30
पोस्ट-कोविड-19 सिंड्रोमची लक्षणं आणि त्याच्याशी संबंधित धोके समजून घ्या.

काही लोकांमध्ये असं दिसून आलं आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही ते अनेक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत. अलीकडेच, एम्सने एका रिसर्चमध्ये मोठा खुलासा केला आहे की, लाँग कोविडमधून बरे झाल्यानंतरही ७० टक्के लोकांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास दिसून आला आहे.
पोस्ट-कोविड-19 सिंड्रोमची लक्षणं आणि त्याच्याशी संबंधित धोके समजून घ्या. फुफ्फुसं नीट काम करू शकत नाहीत. याशिवाय आहारातील बदलाचाही कोरोनाबाधितांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानसिक बदल आणि झोप नीट लागत नसल्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारीही ते करत आहेत.
लाँग कोविडशी संबंधित २०० हून अधिक लक्षणं आढळून आली आहेत. कालांतराने लक्षणं तशीच राहू शकतात. आणखी वाढू शकतात किंवा निघून जाऊ शकतात आणि नंतर परत येऊ शकतात.
जास्त थकवा, विशेषत: एखादी क्रिया केल्यानंतर थकवा जाणवतो. स्मरणशक्ती कमी होणं... ज्याला अनेकदा ब्रेन फॉग म्हणतात. चक्कर येणे किंवा चक्कर येतंय असं सतत वाटणं. चव न समजणं किंवा वास न येणं ही लक्षणं दिसतात.
झोपेसंबंधित समस्या, श्वास घेताना त्रास होणं, खोकला, डोकेदुखी, जलदगतीने हृदयाचे ठोके, पचनसंबंधित समस्या, बद्धकोष्ठता किंवा पोट फुगणं या समस्यांचा देखील सामना करावा लागतो.
लाँग कोविड असलेल्या काही लोकांना इतर आजार देखील असू शकतात. लाँग कोविडमुळे होणाऱ्या काही आजारांमध्ये मायग्रेन, फुफ्फुसाचा आजार, ऑटोइम्यून आजार आणि क्रोनिक किडनी यांचा समावेश होतो.
आर्टेरिओस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस आणि व्हॅस्कुलर बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कोरोनाच्या १००० दिवसांत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांचा धोका वाढला आहे.
द नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांचं असं मत आहे की, ही परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे आणि अनेकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका पूर्वीपेक्षा जास्त आहे.
कोरोना महामारीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे, तज्ज्ञ म्हणाले की, कोरोनानंतर कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका पूर्वीच्या तुलनेत वाढला आहे आणि त्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हार्ट फेल्यूअरचा धोका आहे.