शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Weight Loss : खूप खाऊनही काही लोक लठ्ठपणाचे शिकार का होत नाहीत? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 1:20 PM

1 / 9
Weight Loss : वजन कंट्रोल(weight Loss) करण्यासाठी एक्सरसाइज करणे आणि आहारावर विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, काही असेही लोक असतात जे खूप खातात आणि कोणत्याही प्रकारची एक्सरसाइजही(Exercise)) करत नाहीत. तरी सुद्धा या लोकांचं वजन वाढतं. चला जाणून घेऊ यामागचं नेमकं कारण काय आहे.
2 / 9
वजन न वाढण्याचं कारण केवळ मेटाबॉलिज्म चांगलं असणं हेच नाही. यामागे अनेक कारणे आहेत. जसे की, आनुवांशिकता, न्यूट्रिशन आणि व्यवहाराची पद्धतही बॉडी वेट कायम ठेवण्यास मदत करते. वजन वाढणं किंवा न वाढणं प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या रूटीनवर अवलंबून असतं.
3 / 9
त्यासोबतच एक आणखी कारण आहे ज्याबाबत वाचल्यावर तुम्हाला विचित्र वाटेल. काही लोक दुसऱ्यांसमोर जास्त किंवा त्यांच्या बरोबरीचं खातात. पण सत्य हे असतं की, ही त्यांची डेली डाएट नसते.
4 / 9
जे लोक बाहेर दुसऱ्यांसमोर खूप जास्त खातात ते घरी कमी खातात. असं करून ते बॅलन्स करतात. कॅलरी बॅलन्स करत असल्याने त्यांचं वजन वाढत नाही.
5 / 9
खूप खाऊनही काही लोक स्लिम राहण्याचं आणखी एक कारण असतं. ते म्हणजे फिजिकल अॅक्टिविटी. फिजिकल अॅक्टिविटीचा अर्थ केवळ जिममध्ये घाम गाळणं नाही. याचा अर्थ आहे की, तुम्ही पूर्ण दिवस चालत किंवा घरातील कोणत्या ना कोणत्या कामात बिझी रहावं.
6 / 9
काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, काही लोकांना आनुवांशिकपणे फिजिकल अॅक्टिविटी करण्याची जास्त सवय असते. यामुळे त्यांच्या कॅलरी बर्न होता राहतात त्यानेच त्यांचं वजन कंट्रोल राहतं.
7 / 9
त्यासोबतच काही लोक दुसऱ्यांच्या तुलनेत तिच एक्सरसाइज करून जास्त कॅलरी बर्न करतात. हे सुद्धा त्यांच्या अनुवांशिकतेवर अवलंबून असतं.
8 / 9
पीएलओएल जेनेटिक्समध्ये प्रकाशित २०१९ मधील एका रिसर्चनुसार, २५०पेक्षा अधिक वेगवेगळ्या डीएनएचा संबंध लठ्ठपणाशी असतो. पण हे सर्वच बाबतीत खरं नाही. रिसर्चनुसार, काही लोकांचा जेनेटिक्स लठ्ठपणाचा असतो. पण ते तरी सुद्धा स्लिम असतात.
9 / 9
त्यासोबतच स्लिम किंवा लठ्ठ असणं तुमच्या लाइफस्टाईलवरही अवलंबून असतं. तुम्ही दारू पिता, किती जंक फूड खाता, किती एक्सरसाइज करता आणि तुम्ही कशाप्रकारे झोपता या गोष्टींचाही प्रभाव वजनावर पडत असतो.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स