मध्यरात्री भूक लागल्यावर खाऊ शकता 'हे' स्नॅक्स; वजनही वाढणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 09:22 PM2021-02-23T21:22:57+5:302021-02-23T22:12:03+5:30

अनेकदा रात्रीचं जेवण घेतल्यानंतरही मध्यरात्री एक किंवा दोनच्या सुमारासही भूक लागते. मग अशावेळी घरातले सर्व खाऊचे डबे आपण शोधत बसतो आणि जे मिळेल ते खातो. पण मध्यरात्रीच्या भूकेवर कोणते हेल्दी स्नॅक्स आहेत जे आपण जाणून घेऊयात...

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे डाएट प्लान फॉलो करत असतात. पण जेव्हा स्नॅक्ससमोर येतात तेव्हा स्वत:वरचं नियंत्रण सुटतं आणि जीभेचे चोचले पुरविण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय उरत नाही. अनेकदा रात्रीचं जेवण घेतल्यानंतरही मध्यरात्री एक किंवा दोनच्या सुमारासही भूक लागते. मग अशावेळी घरातले सर्व खाऊचे डबे आपण शोधत बसतो आणि जे मिळेल ते खातो. पण मध्यरात्रीच्या भूकेवर कोणते हेल्दी स्नॅक्स आहेत जे आपण जाणून घेऊयात...

मखाणा आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यास तेलात तळण्याची किंवा भाजण्याची अजिबात गरज नाही. आपण फक्त मंद आचेवर भाजून ते खाऊ शकतो. ते खाल्ल्यानं तुमचं वजनही वाढत नाही आणि आपण ते भाजून हवाबंद बरणीत ठेवू शकतो.

नाचणीचे चिप्स हे आरोग्यासाठी फायदेशीर चिप्स असून ते रात्री नक्कीच खाऊ शकतो. पण चिप्स भाजलेले असावेत हे लक्षात ठेवा.

मध्यरात्री तुम्ही हर्बल चहा देखील घेऊ शकता. हर्बल चहामध्ये मध आणि दालचिनीसारखे फ्लेवर देखील असतात. ज्यांना रात्रीची लवकरच झोप येत नाही त्यांनी नक्कीच हर्बल चहा घ्यायला हवा.

तुमच्या घरात स्नॅक्स नसतील तर फळं देखील खाऊ शकता. कोणत्याही स्नॅक्सपेक्षा कोणतंही फळ हे नक्कीच आरोग्यदायी ठरतं

१० ते १२ बदाम, शेंगदाणे, काजू आणि अक्रोड सर्वोत्तम आरोग्यदायी स्नॅक्स आहेत असं आरोग्य तज्ज्ञांचंही मत आहे. यामध्ये प्रोटीन, फायबर आणि गुड फायबरचं चांगलं प्रमाण असतं यातून तुमची भूकही भागेल आणि शरिराला आवश्यक प्रोटीनही मिळतात.