How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 22:44 IST2025-07-28T22:05:17+5:302025-07-28T22:44:40+5:30

How To Deal With Heart Attack: हल्ली हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच मदतीला कुणीही जवळ नसताना अचानक हार्ट अटॅक आला तर काय करावे... समजून घ्या

हैदराबादमध्ये २५ वर्षीय गुंडला राकेश नावाच्या तरुणाचा बॅडमिंटन खेळताना हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आजकाल हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. गेल्या ३-४ वर्षांत हा प्रकार सर्रास पाहायला मिळतोय. हृदयविकाराचा झटका अचानक येतो, त्यामुळे अशा वेळी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो.

सहसा हृदयविकाराचा झटका आल्यावर आसपासच्या लोकांनी काय करावे, याबद्दल सांगितले जाते. पण झटका येण्याच्या क्षणी जर तुम्ही एकटे असाल तर काय कराल? याबद्दल तज्ज्ञांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घ्या.

२५ वर्षांहून अधिक अनुभव असलेले हृदय सर्जन डॉ. जेरेमी लंडन यांनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान तुम्ही एकटे असाल तरीही तुम्हीच तुमचा जीव वाचवू शकता.

आपत्कालीन मदत कक्षाला (Emergency Helpline) कॉल करा: - Marathi News | How To Deal With Heart Attack | Latest health Photos at Lokmat.com

जर तुम्हाला हृदयविकाराची कोणतीही लक्षणे जाणवली तर वेळ घालवू नका. तात्काळ इमर्जन्सी हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा. त्यांना लक्षणे आणि स्थितीबद्दल माहिती द्या. शक्य असल्यास, मदत येईपर्यंत फोनवरून संपर्कात राहा, कारण उशीर केल्याने तुमची प्रकृती आणखी बिकट होऊ शकते आणि जीवावर बेतू शकते.

मदत मिळण्यासाठी घरात काही गोष्टी करा: - Marathi News | How To Deal With Heart Attack | Latest health Photos at Lokmat.com

मदत मिळण्याची वाट पाहत असताना, तुमच्या घरात काही गोष्टी करा, जेणेकरून आपत्कालीन मदत लवकर पोहोचू शकेल. जर रात्रीची वेळ असेल, तर तुमच्या पोर्चचे दिवे चालू करा, जेणेकरून तुमचे घर सहजपणे उठून दिसेल. दरवाजा उघडून ठेवा, जेणेकरून तुम्ही कुठल्याही अवस्थेत असाल तरीही मदतनीस घराच्या आत येऊ शकतील.

पाय उंच करून झोपा किंवा खुर्चीत शांत बसा: - Marathi News | How To Deal With Heart Attack | Latest health Photos at Lokmat.com

या गोष्टी केल्यानंतर शक्य तेवढी ऊर्जा वाचवण्यासाठी आरामात बसा किंवा झोपा. तुमचे पाय थोडेसे उंच करून बेड किंवा सोफ्यावर झोपल्याने श्वास घेणे सोपे होते आणि रक्त प्रवाह सुधारतो. झोपणे कठीण वाटत असल्यास, खुर्चीवर शांतपणे बसा आणि जास्त हालचाल करणे टाळा. स्थिर राहिल्याने बेशुद्ध पडण्याचा धोका कमी होतो.

मित्राला किंवा कुटुंबाला लगेच कळवा: - Marathi News | How To Deal With Heart Attack | Latest health Photos at Lokmat.com

आपत्कालीन मदतीसाठी कॉल केल्यानंतर, कुटुंबातील सदस्याला किंवा मित्राला कॉल करा. काय झाले ते सांगा, रुग्णवाहिका येत असल्याचीही कल्पना द्या. म्हणजे ते लोक तातडीने रुग्णालयात येऊन तुम्हाला भेटू शकतात आणि डॉक्टर्सना तुमच्या आरोग्याबद्दल नीट माहिती देऊ शकतात आणि गरज पडल्यास तुम्हाला मदतही करू शकतात.