शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्रपाळीत काम करताय? मग जाणून घ्या कशी घ्याल आरोग्याची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 9:40 PM

1 / 6
आजच्या काळात जर तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर नाईट शिफ्टमध्ये काम करणं तुमच्या जीवनाचा एक भाग झालेलं असेल. मात्र रात्रपाळीत काम करत असल्याने अनेकदा तुमच्या आरोग्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं.
2 / 6
झोप नसल्यामुळे तुम्ही तणावाखाली जाता आणि चीडचीड वाढते. त्यामुळे नाईट शिफ्ट करणं गरजेचे असले तरी तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं तुमचचं काम आहे.
3 / 6
नाईट शिफ्ट करुन जेव्हा तुम्ही घरी याल, तेव्हा भरपूर आराम करा, ज्या रुममध्ये आपण झोपाल त्याठिकाणी पूर्णपणे अंधार ठेवा. झोप पूर्ण झाली तर तुमची चीडचीड कमी होईल आणि अन्य त्रासातूनही तुम्ही मुक्त व्हाल.
4 / 6
त्याचसोबत रोजच्या रोज योगा करा. प्राणायम आणि वज्रासन हा योगा केल्याने तुम्ही चीडचीड करत नाही तसेच एकाग्रता वाढण्यात मदत होते.
5 / 6
नाईट शिफ्टमध्ये काम करताना तुम्ही मध्यरात्री जेवण करु नका. त्याने तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. नाईट शिफ्ट करण्याअगोदर जेवण करुन घ्यावं, जेणेकरुन तुमच्या कामात तुमचं लक्ष लागेल. नाईट शिफ्टमध्ये काम करताना रात्री 8 ते 10 मध्ये जेवण करायला हवं.
6 / 6
काही जणांना वाटतं, जेवण केल्यानंतर झोप येते म्हणून ते जेवण करुन काम करत नाही. अशावेळी तुम्ही हलकं जेवण करा उदा. डाळ-भात, ईडली-डोसा
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स