मस्तच! हृदयापासून ते मेंदूपर्यंत अत्यंत गुणकारी ठरते 'कोथिंबीर'; जाणून घ्या, फायदे अन् बरंच काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 14:37 IST2022-06-08T14:26:45+5:302022-06-08T14:37:34+5:30
Benefits Of Coriander : रोजच्या जेवणात वापरली जाणारी कोथिंबीर हृदयापासून ते मेंदूपर्यंत अत्यंत गुणकारी ठरते.

कोथिंबिरीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हमखास केला जातो. यामुळे अन्नाची चव तर वाढवतेच पण त्याचा सुगंधही रिफ्रेशिंग असतो. रोजच्या जेवणात वापरली जाणारी ही कोथिंबीर हृदयापासून ते मेंदूपर्यंत अत्यंत गुणकारी ठरते.
हेल्थलाईनच्या माहितीनुसार, कोथिंबिरीच्या पानांमध्ये असे अनेक एन्झाइम्स आढळतात जे रक्तातील साखर कमी करण्यात मदत करतात. ज्यांना उच्च रक्तदाब किंवा टाइप 2 मधुमेहाची समस्या आहे, त्यांच्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे.
मसालेदार चटणी बनवून रोजच्या जेवणाची चव वाढवू शकता. यासोबतच अनेक फायदे देखील आहेत. आहारात कोथिंबिरीचा समावेश केल्याने आरोग्य विषयक कोणत्या समस्या टाळता येतील ते जाणून घेऊया.
पचनक्रिया सुधारते
कोथिंबिरीच्या पानांमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे पचनक्रिया चांगले ठेवण्यास मदत करतात. हिरवी कोथिंबीरी मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
तणाव घालवते
कोथिंबिरीच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट तणाव कमी करण्यास मदत करतात. कोथिंबिरमुळे स्ट्रेसची समस्या कमी होऊ शकते, असे संशोधनात आढळून आले आहे. तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील फायदा होतो.
हृदयासाठी चांगली
कोथिंबिरीच्या पानामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने व्यतिरिक्त कॅल्शियम, लोह आणि मँगनीज मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
कोथिंबिरीच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित समस्या आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. ते अत्यंत फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे.
मधुमेह
रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोथिंबीर खूप फायदेशीर आहे. कोथिंबीर खाल्ल्याने अनेक एंजाइम सक्रिय होतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
संसर्गामध्ये फायदेशीर
कोथिंबिरीच्या पानांमध्ये अँटी-मायक्रोबायल घटक आढळतात, जे पोटाच्या संसर्गापासून आणि संक्रमित अन्नामुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरतात. इतकंच नाही UTI पासून संरक्षण करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.
मेंदूसाठी उपयुक्त
कोथिंबिरीच्या पानामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात की मेंदूची सूज, स्मरणशक्ती कमी होणे, चिंता इत्यादी समस्या देखील त्याच्या नियमित सेवनाने कमी होतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.