शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mediclaim: 'मेडीक्लेम' झाला रिजेक्ट तर इथे करु शकता तक्रार, तातडीनं मिळेल संपूर्ण भरपाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 6:11 PM

1 / 10
अचानक होणाऱ्या दुर्घटना किंवा आजारांचा सामना करताना आर्थिक चणचण भासू नये त्यामुळे मेडीक्लेम घेणं आता सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. यासाठी पॉलिसीधारक वेळेवर प्रिमिअम देखील भरू लागला आहे. असं असतानाही विमा कंपन्यांकडून विमा धारकांना गरजेवेळी योग्य ती सुविधा मिळत नाही.
2 / 10
मेडीक्लेम असूनही विमा कंपनीकडून तो रिजेक्ट झाल्यानंतर मोठा धक्का पॉलिसी धारकाला बसतो. अशावेळी नेमकं काय करायचं हेच पॉलिसी धारकांना कळत नाही. याची तक्रार आपण कुणाकडे करायची याचीही अनेकांना माहिती नसते.
3 / 10
कोणतीही कंपनी मेडीक्लेम जारी करत असताना त्याचवेळी पॉलिसीशी निगडीत सर्व नियम आणि अटी देखील सांगत असते. पण त्यावेळी बहुतांश लोक नियम व अटींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकदा मेडीक्लेमच्या रिजेक्शनला सामोरं जावं लागतं. कोणतीही कंपनी जेव्हा मेडीक्लेम रिजेक्ट करते त्यावेळी त्यामागचं कारण पॉलिसीधारकाला लिखित स्वरुपात सांगणं बंधनकारक आहे.
4 / 10
अनेकदा विमा कंपन्या चुकीचं कारण देऊन मेडीक्लेम रिजेक्ट करतात आणि हे नियमांचं उल्लंघन करणारं आहे. तुमच्यासोबतही असं झालं तर तुम्ही विमा कंपनीच्या रजिस्टर्ड पोस्ट द्वारे पत्र लिहून तुमची तक्रार दाखल करू शकता.
5 / 10
तुमचा मेडीक्लेम नियमांचं उल्लंघन करत नसल्याचं तुम्हाला पत्रात पटवून द्यावं लागेल. तुम्ही तुमचं पत्र आणि ईमेलची कॉपी IRDAI हैदराबादच्या ईमेल आयडी complaints@irdai.gov.in वर पाठवू शकता. तसंच मेडीक्लेम देणाऱ्या कंपनीच्या ग्रीवेन्स सेलला देखील ई-मेल पाठवू शकता.
6 / 10
तुम्ही पाठवत असलेल्या ई-मेलमध्ये योग्य पुरावे असणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही क्लेम रिजेक्ट झाल्याबद्दल नाखुष असून तुमच्या झालेल्या नुकसानाचीही माहिती ई-मेलमध्ये द्यायला विसरू नका.
7 / 10
पत्र आणि ईमेल पाठवल्यानंतरही विमा कंपनीकडून काहीच प्रतिक्रिया दिली गेली नाही किंवा तुमचं समाधान झालं नाही. तर तुमच्या विभागातील विमा लोकपालाकडे याबाबतची तक्रार दाखल करू शकता. यासाठी केवळ एका कोऱ्या कागदावर तुमची संपूर्ण तक्रार लिहून रजिस्टर्ड पोस्ट किंवा ई-मेलच्या माध्यमातून विमा लोकपालांकडे पाठवू शकता. यात तुम्हाला तुमचं नाव, सही, विमा पॉलिसीचा क्रमांक, मेडीक्लेमचा क्रमांक आणि धनराशी याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
8 / 10
तसंच पत्रात पिनकोडसह संपूर्ण पत्ता, फोन क्रमांक, ईमेल आयडी, विमा देणाऱ्या कंपनीचं नाव आणि कार्यालयाचा पत्ता देखील नमूद करावा लागेल. याशिवाय रुग्णालयाची सर्व बिलं, डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन, इन्वेस्टिगेशन रिपोर्ट, विमा कंपनीकडून दिलं गेलेलं रिजेक्शन लेटरची कॉपी देखील पाठवावी लागेल.
9 / 10
विमा कंपनीनं कशा पद्धतीनं तुमचा दावा खरा असूनही मेडीक्लेम नाकारला त्याची सविस्तर माहिती पत्रात नमूद करावी. विमा लोकपाल हे तुम्ही केलेला दावा आणि कंपनीच्या नियमांची पडताळणी करुन मेरिटच्या आधारावर तक्रारीचं निवारण करतात.
10 / 10
एक गोष्ट यात अत्यंत महत्वाची आहे. ती म्हणजे मेडीक्लेम रिजेक्शनबाबतचा खटला जर कोणत्याही ग्राहक तक्रार निवारण कोर्टात प्रलंबित असेल तर त्यावर विमा लोकपाल कोणताही निर्णय देऊ शकत नाहीत.
टॅग्स :Medicalवैद्यकीयmedicineऔषधंHealthआरोग्य