शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Health Care: समस्या केसांची असो नाहीतर दातांची, तुरटीचा स्वस्त-मस्त उपाय सर्व समस्या करेल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 16:53 IST

1 / 7
आजकाल तरुण वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी तुरटीची बारीक पूड करून, तुम्ही केसांना लावत असलेल्या तेलामध्ये ते थोडेसे कोमट करून, त्यात मिसळावी. अर्धा तासांनी ही पूड त्या तेलामध्ये चांगलीच विरघळलेली दिसेल. मग या तेलाने डोक्याला मसाज करावा. नंतर नेहमीप्रमाणे केस धुऊन टाकावे. महिन्यातून २-३ वेळा हा उपचार केल्यास हळूहळू पांढऱ्या केसांची समस्या कमी झालेली दिसेल. तसेच बऱ्याचदा शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये डोक्यात उवा निर्माण होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी हे तुरटी मिश्रित तेल लावल्याने उवांचा नायनाट होतो आणि सतत डोक्याला खाज निर्माण होण्याच्या समस्येपासून सुटकारा मिळतो.
2 / 7
एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ व एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करावे. हे पाणी गार झाल्यावर या पाण्याने गुळण्या केल्यास दातावरील किड कमी होते. शिवाय तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी येत असल्यास ती हळूहळू नाहीशी होऊन तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
3 / 7
वातावरणातील बदलामुळे ताप, खोकला, दमा यासारख्या समस्या डोके वर काढू लागल्या आहेत. या समस्यांच्या सुरुवातीच्या काळातच रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये १० ग्रॅम खडी साखर व 2 चिमूट तुरटीची पूड एकत्र करून घ्यावी. यामुळे चांगलाच आराम पडतो.
4 / 7
बऱ्याच जणांना मांसपेशी आखडण्याची समस्या भेडसावीत असते. अशावेळी तुरटी आणि हळदीची पूड एकत्र करून आखडलेल्या मांसपेशीवर लावल्यास आराम मिळतो.
5 / 7
तुरटीची पूड करून त्यात थोडे गुलाबजल टाकून, त्याची दाटसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा धुवून त्यावर लावावी. १०-१५ मिनिटे ठेवून मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुमची त्वचा उजळलेली दिसेल. शिवाय चेहऱ्यावर वांग किंवा डागाची समस्या असल्यास ते देखील या वापराने दूर होतात
6 / 7
बऱ्याच जणांचे पाय काळवंडलेले आणि त्यावरील त्वचा फाटलेली असते. अशावेळी कोमट पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवल्यास पायांच्या त्वचेमध्ये चांगलाच फरक झालेला दिसून येतो.
7 / 7
आता इतके सारे वाचल्यानंतर या स्वस्त अशा तुरटीचे किती फायदे आहेत, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की, तुरटीचा वापर हा माफक प्रमाणात असावा. रोजच्या रोज तुरटीचा वापर केल्यास तो आरोग्याच्या दृष्टीने नुकसानदायी ठरू शकतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स