मस्तच! रोज एक चमचा तूप खाण्याचे असंख्य फायदे; रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 01:45 PM2024-06-09T13:45:51+5:302024-06-09T13:58:11+5:30

आहारात तुपाचा समावेश केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया...

तूप खाणं हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. तुपामध्ये हेल्दी फॅट आढळते जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. शरीराला उर्जा देण्यासोबतच अनेक आजारांपासून संरक्षण करतं. तुपाच्या सेवनाने तुमची पचनक्रिया चांगली राहते.

तूप त्वचेसाठी फायदेशीर आहे. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे प्रत्येकाने त्याचं सेवन करावं. आहारात तुपाचा समावेश केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया...

तुपामध्ये ब्युटीरिक एसिड असते जे शरीराला रोगाशी लढणाऱ्या टी सेल्स तयार करण्यास मदत करते.

तुपाचे सेवन केल्याने पोट निरोगी राहते कारण त्यात आवश्यक पोषक आणि प्रोबायोटिक्स असतात जे पोटातील हेल्दी बॅक्टेरियांना प्रोत्साहन देतात. तूप हे व्हिटॅमिन ए आणि ई आहे जे हेल्दी लिव्हर, संतुलित हार्मोन्स आणि प्रजननक्षमतेसाठी आवश्यक आहेत.

तुपामध्ये हेल्दी फॅट असतं ज्यामुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. तुपामुळे हृदयविकार होत नाही. तुपामध्ये ब्युटीरिक एसिड असतं. यामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट हे अँटीइंफ्लेमेटरी बनवतं.

तूप त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे कारण ते त्वचेचे पोषण करतं आणि तिला हायड्रेटेड ठेवते. तुपातील पोषक तत्व त्वचेला टाईट ठेवतात.

तुपात व्हिटॅमिन ई असतं जे केसांसाठी उत्तम असतं. हे केसांना आतून मजबूत करतं आणि त्यांचे पोषण करते. केस मजबूत करण्यासाठी अनेकजण केसांना तूपही लावतात. याचे रोज सेवन केल्यास केस मजबूत होऊ शकतात.