फेलूदा स्ट्रिप टेस्ट आणि लसीचा वापर भारतात कधी होणार?, अखेर आरोग्यमंत्र्यानी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 11:45 AM2020-10-12T11:45:08+5:302020-10-12T12:03:17+5:30

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल संडे संवाद या कार्यक्रमात लसीसंदर्भातील महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाची लढाई ही धर्मापेक्षा मोठी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार फेलूदा पेपर स्ट्रिप टेस्टचा वापर पुढच्या काही महिन्यात भारतात सुरू होऊ शकतो.

लसीबाबत सरकारी रणनीतीच्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोना लसीचा वापर आपातकालीन स्थितीत सुरू करण्यासाठी सुरक्षेबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे. जेणेकरून रुग्णाच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही. भारतातील अनेक कंपनीच्या लसींनी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण केला असून आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात होत आहे. या लसींच्या सुरक्षेबाबत पूर्ण माहिती मिळाल्यानंतर आपातकालीन स्थितीत वापरासाठी विचार करता येऊ शकतो.

आरोग्यमंत्र्यांनी संडे संवाददरम्यान दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लस देण्यासाठी गंभीर आजारांनी पिडीत असलेल्या लोकांना, संक्रमणाचा जास्त धोका असलेल्या लोकांना सगळ्यात आधी लस दिली जाईल. तसंच मृत्यूदर वाढण्यापासून रोखणं हे उद्दिष्ट असेल.

फेलूदा पेपर स्ट्रीप टेस्टबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, या टेस्टमध्ये ९६ टक्के संवेदनशिलता आणि ९८ टक्के वैशिष्ट्य पाहिले गेले आहेत. इंस्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अॅण्ड इंटग्रेटिव बायोलॉजी (IGIB) मध्ये फेलूदा चाचणीसाठी जवळपास २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा समावेश होता.

'फेलुदा' हा संपूर्ण स्वदेशी वैज्ञानिक शोध आहे. यामुळे वेगाने कोरोना चाचणी करण्यास उपयुक्त आहे. याचं मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ही टेस्ट अगदी स्वस्तात उपलब्ध होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. परिणामी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांच्या कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे.

याआधीच कोरोना रॅपिड चाचणीला केंद्राने परवानगी दिली होती. मात्र, चीन वरुन मागवण्यात आलेल्या किटमध्ये काही त्रुटी आढळल्याने हा निर्णय लाबणीवर पडला होता. मात्र, आता हे किट विकसीत झाल्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात मदत आहे.

ICMR ने कोविड-19 च्या संक्रमणावर आधारित एक रिसर्च केला होता. यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, रिइन्फेक्शन म्हणजे कोरोनतून बरं झाल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाचं इन्फेक्शन होणं.

आयसीएमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या रिइन्फेक्शनच्या केसेस चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आल्या आहेत.

RT- PCR टेस्टने रुग्ण रिकव्हर झाल्यानंतर दीर्घकाळ शरीरात नष्ट झालेल्या व्हायरसला डिटक्ट करता येऊ शकतं.

(image Credit- PTI, Reuters, getty images)