Exactly how monkeypox is spreading in the world; What would you care about?
मंकीपॉक्स जगात नेमका कसा पसरतोय; तुम्ही काय काळजी घ्याल? By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:51 AM2024-08-22T11:51:56+5:302024-08-22T12:20:52+5:30Join usJoin usNext क्लेड १ हा मंकीपॉक्सचा नवीन प्रकार अधिक घातक आहे. नवी दिल्ली : मध्य आणि पूर्व आफ्रिकेत संसर्गजन्य मंकीपॉक्स (एमपॉक्स)ची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आफ्रिकेबाहेरही अनेक देशांत या आजाराची प्रकरणे नोंदविली जात आहेत. हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. क्लेड १ हा मंकीपॉक्सचा नवीन प्रकार अधिक घातक आहे.डब्ल्यूएचओ काय म्हणते? मंकीपॉक्स यापूर्वी प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरत होता, मात्र आता तो थेट माणसांमधून माणसांत पसरत आहे. जगातील इतर देशांमध्येही या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी म्हटले आहे.विषाणूचे तीन प्रकार क्लेड १ : याचा सर्वाधिक प्रकोप मध्य आफ्रिकामध्ये आहे. आजारी १० टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. क्लेड २ : कमी हानिकारक असला, तरी तो अनेक देशांमध्ये पसरत आहे. क्लेड आयबी : हा मंकीपॉक्स अधिक वेगाने पसरतो आहे.मंकीपॉक्स कसा पसरतो? १) संक्रमित व्यक्तीच्या जवळ आल्याने. २) एकापेक्षा अधिक पार्टनरशी लैंगिक संबंध ठेवल्याने. ३) डोळे, श्वसनसंस्था, नाक किंवा तोंडातून शरीरात मंकीपॉक्स प्रवेश करू शकतो. ४) संक्रमित व्यक्तीने वापरलेला बिछाना, कपडे आणि टॉवेल यांसारख्या वस्तूंना स्पर्श केल्यानेदेखील मंकीपॉक्स पसरू शकतो. ५) माकडे, उंदीर यांसारख्या विषाणू संक्रमित प्राण्यांशी संपर्कात आल्याने. ६) आईपासून गर्भाला संक्रमण. ७) २०२२ मध्ये मंकीपॉक्स विषाणू लैंगिक संपर्काद्वारे अधिक पसरला.पुरळ उठणे लक्षणांमध्ये सुरुवातीला पुरळ उठण्यास सुरुवात होते. यानंतर त्यात पू येतो. यात हाताच्या तळव्यावर किंवा पायाच्या तळव्यावर किंवा शरीरावर इतर ठिकाणीही जखमा होऊ शकतात. पू झाल्यानंतर जखम वाढून तिथे खड्डा पडतो.उपाय काय? हा आजार सामान्यत: सौम्य असून, अनेक लोक आराम आणि तापावरील उपचाराशिवाय २ ते ४ आठवड्यांत बरे होतात. मंकीपॉक्सचा प्रसार केवळ संसर्गावर नियंत्रण ठेवूनच नियंत्रित केला जाऊ शकतो. अलगीकरण करणे, वारंवार हात चांगले धुणे. कपडे धुताना हातमोजे घाला. कपडे हवेत हलविल्याने एमपॉक्स हवेत पसरतो. स्मॉलपॉक्स लस ३ दिवसांच्या आत घेतल्यास ती या विषाणूवर ८५ टक्के प्रभावी आहे.टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सजागतिक आरोग्य संघटनाHealthHealth TipsWorld health organisation