दररोज एक लिंबू खाणं हृदयासाठी फायदेशीर, लिंबाचे माहीत नसलेले हे फायदे वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 05:53 PM2021-06-24T17:53:57+5:302021-06-24T18:13:02+5:30

लिंबाचे अगणित फायदे आहेत. अनेकजण तुम्हाला लिंबाचे वेगवेगळे फायदे सांगतील. काही जण म्हणतील लिंबू वजन कमी करण्यासाठी योग्य तर काही जण म्हणतील हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त. डॉ. अबरार मुल्तानी यांनी झी न्यूज हिंदीच्या संकेतस्थळाला सांगितलेले लिंबाचे फायदे वाचून तुम्ही अवाक् व्हाल.

लिंबामध्ये पेक्टीन नामक सॉल्युबल फायबर असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही सकाळी जर गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायलात तर कॅलरी बर्न करण्याची प्रक्रिया जलद होते.

लिंबामध्ये ३१ ग्राम व्हिटॅमिन सी असतं. हे तुमच्या हृदयासाठी अत्यंत फायदेशीर असतं. लिंबाच्या सेवनाने स्ट्रोक व इतर हृदयासाठीच्या समस्या दूर होतात.

नैसर्गिक अँटीसेप्टिक गुणधर्मांमुळे लिंबू त्वचा समस्यांवर फारच गुणकारी ठरते. कारण लिंबात मुळातच नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्यातील लाइटनिंग एजेंटमुळे त्चचेवर चांगला परिणाम होतो.

त्वचेप्रमाणे केसांच्या सौदर्यावरदेखील लिंबाचा खूपच चांगला परिणाम होतो. कोरडे आणि निस्तेज केस असो किंवा केसांना फाटे फुटणे, कोंडा होणे अशा समस्यां असो तुम्ही यासाठी लिंबूचा वापर करू शकता.

मधूमेहींनी लिंबू पाणी पिण्याचे अनेक चांगले फायदे असतात. शिवाय यामुळे त्यांचे वजनही कमी होते. शरीर हायड्रेट राहील्याने दिवसभर निवांत वाटते.

बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास लिंबू पाणी पिणे नेहमीच चांगले ठरेल. कारण नियमित लिंबूपाणी घेतल्यास हळूहळू ही समस्या कमी होते.

लिंबूपाणी ब्लडप्रेशर आणि मधूमेहींसाठी उपयुक्त तर आहेच शिवाय लिंबूपाण्याने ताण आणि नैराश्यावरदेखील मात करता येते.

तुम्हाला किडनीस्टोनचा त्रास असेल तर लिंबू हा यावरील उत्तम उपाय आहे. त्यामुळे तुमच्या लघवीतील पीएच लेवल वाढवून किडनी स्टोनची समस्या दूर होते.

अॅनिमियाच्या रुग्णांनी लिंबाचे सेवन करावेच. यामुळे शरीरात लोह शोषुन घेण्याची समस्या वाढते आणि यावर आराम मिळतो.

अपचनामुळे पोटात दुखत असल्यास लिंबाच्या रसात आल्याचा रस आणि साखर मिसळून प्या. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळेल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!