चिंताजनक! हर्ड इम्यूनिटीच्या भरोशावर बसू नका, कोरोनाने फेल केला हा फॉर्म्यूला; तज्ज्ञांकडून इशारा....

Published: May 5, 2021 10:21 AM2021-05-05T10:21:09+5:302021-05-05T10:32:08+5:30

Coronavirus - Herd Immunity : हेल्थ एक्सपर्टनुसार, इतक्यात हर्ड इम्यूनिटी तयार होणार नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस असाच पसरत राहणार. त्यांना वाटतं की, कोविडने मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये पेशंट भरती होत राहणार.

सर्वांनाच आठवत असेल की, कोरोनाची पहिली लाट आली होती तेव्हा हर्ड इम्यूनिटी (Herd Immunity against Corona) बाबत बरीच चर्चा झाली होती. तेव्हा आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले होते की, जेव्हा एखाद्या भागात जास्तीत लोक संक्रमित होतील तेव्हा त्यांच्या शरीरात अॅंटीबॉडी तयार होतील. ज्याने भविष्यात कोरोनापासून सुरक्षा मिळेल. मात्र, आता एक्सपर्ट म्हणतात की, कोरोनाचे नवनवीन म्यूटेंट्सने या थेअरीला आव्हान दिलं आहे.

हेल्थ एक्सपर्टनुसार, इतक्यात हर्ड इम्यूनिटी तयार होणार नाही. त्यामुळे कोरोना व्हायरस असाच पसरत राहणार. त्यांना वाटतं की, कोविडने मृत्यू आणि हॉस्पिटलमध्ये पेशंट भरती होत राहणार. मात्र, इथून सहा ते नऊ महिन्यानंतर यात घट होईल.

हर्ड इम्यूनिटी तेव्हा तयार होते जेव्हा लोकसंख्येचा मोठा भाग व्हायरस विरोधात इम्यून होतो. याच्या दोन पद्धती आहेत व्हायरसचं संक्रमण किंवा लसीकरण. अशा स्थितीत ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत नाही. तेही संक्रमणाच्या धोक्यातून बाहेर होतील. कारण जास्त लोकांची इम्यून सिस्टीम मजबूत झाल्याने व्हायरस एकमेकांत शिरण्याची शक्यता पूर्ण कमी होईल.

पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्रीनाथ रेड्डी म्हणाले की, 'हे मुळात हर्ड प्रोटेक्शन आहे हर्ड इम्यूनिटी नाही. व्हायरस विरोधात इम्यूनिटी विकसित करू न शकणारी व्यक्ती जर व्हायरस पसरत असलेल्या ठिकाणी जात असेल तर तोही संकमित होईल.

हर्ड इम्यूनिटी लोकसंख्येवर आधारित आहे. व्यक्तीवर नाही. रेड्डी म्हणाले की, आज लोक नेहमीच इकडून तिकडे जात-येत असतात. अशात कोरोना विरोधात नॉन इम्यून लोक आताही संक्रमणाच्या जाळ्यात येऊ शकतात. त्यामुळे बरं होईल की, प्रत्येक व्यक्तीने कोविडपासून बचाव करणारी वॅक्सीन घ्यावी. वरिष्ठ महामारी तज्ज्ञ गिरिधर बाबू म्हणाले की, 'व्हायरस विरोधातील आपली लढाई बरीच मोठी चालणार आहे'.

यूकेसारख्या देशात कोविड कुठे ना कुठे नियंत्रणात दिसत आहे. कारण तिथे लॉकडाऊनसोबत वेगाने लसीकरणही होत आहे. ३ मे ला यूकेमध्ये केवळ १,६४९ नवीन कोरोना केसेस समोर आल्या आणि केवळ एका रूग्णाचा मृत्यू झाला. फ्रान्समध्ये मध्य एप्रिलपर्यंत दररोज २५ हजाराच्या आसपास नवीन केसेस येत आहेत. जर्मनी आणि स्पेनमध्ये ऑक्टोबर महिन्यात आणि या वर्षाच्या सुरूवातील केसेस वाढल्या.

गिरिधर म्हणाले की, 'आपल्याला आरोग्यकर्मींची मोठी फौज आणि संसाधनांचा भांडार असाच तयार ठेवायचा आहे. जेणेकरून कोरोनाच्या जेवढ्या लाटा येतील, आपण त्यांचा मुकाबा करत राहू जोपर्यंत तो नष्ट होत नाही'. ते म्हणाले की, लसीकरण हे कोरोना विरोधातील आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे.

देशात कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. तर लसीकरण हळुवार होत आहे. एक्सपर्ट म्हणतात की, अशाने हर्ड इम्युनिटी डेव्हलप व्हायला वेळ लागेल. कारण व्हायरस वेगाने आपलं रूप बदलत आहे आणि प्रत्येक म्यूटेशनकडे संक्रमणाची आपली वेगवेगळी पद्धत असते. त्यामुळे अडचण ही आहे की, जर तुम्ही एखाद्या म्यूटेंटने संक्रमित होऊ कोविडमधून बरेही झालात तरी दुसऱ्या म्यूटेंटने संक्रमित होण्याचा धोका कायम राहतो.

फोर्टिस सी-डॉकचे चेअरमन अनूप मिश्रा म्हणाले की, सुरूवातीला असं मानलं जात होतं की, उपचारानंतर बरा होणार संक्रमित व्यक्ती कोरोना प्रति इम्यून होतो. पण आता तसं काही वाटत नाही.

तेच डॉ. रेड्डी म्हणाले की, कोविड-१९ विरोधात हर्ड इम्यूनिटीचं प्रमाण काय हे ठरू शकलेलं नाही. मात्र, इतकं नक्की माहीत आहे की, संक्रमणानंतर ज्यांच्या शरीरात अॅंटीबॉडी तयार होत आहेत. त्या काही महिन्यात नष्ट होत आहेत.

ते म्हणाले की, 'अशात लसीकरणच चांगला पर्याय आहे. वॅक्सीनचा दुसरा डोज घेताच शरीरात मोठ्या प्रमाणात एंटिजेन तयार होतं. अॅंटीबॉडी सर्व्हेच्या आधारानुसार, आपण हर्ड इम्यूनिटी विकसित केली हा गैरसमज आहे. आम्ही वर्षभरापूर्वीच हर्ड इम्यूनिटीच्या भ्रमाबाबत इशारा दिला होता'.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!