स्मोकिंग करणाऱ्यांपेक्षाही जास्त खराब होऊ शकतात कोरोना रुग्णांची फुफ्फुसं; डॉक्टरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 06:56 PM2021-01-15T18:56:54+5:302021-01-15T19:12:40+5:30

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात वर्षभरापासून हाहाकार पसरवला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर आलेल्या लोकांसाठी एक नकारात्मक माहिती समोर येत आहे.

अमेरिकेतील टेक्सासमधील टेक युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सेंटरच्या साहाय्याक प्राध्यापक डॉ. ब्रिटनी केंडेल यांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोनावर मात केलेल्या लोकांना या आजाराच्या दीर्घकालीन परिणामांचा सामना करावा लागेल. तसंच त्यांची फुफ्फुसं स्मोकिंग करत असलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त संवेदनशील होऊ शकतात.

त्यांनी ट्विटरवर या आजाराचा प्रभाव दाखवण्यासाठी तीन एक्स रेजचा फोटो पोस्ट केला होता. त्यातील एक फोटो स्मोकर फुफ्फुसांचा होता, दुसरा एक्स रे कोरोनातून बाहेर आलेल्या एका रुग्णाच्या फुफ्फुसांचा होता. तिसरा एक्स रे निरोगी माणसाचा होता.

. तिन्ही फुफ्फुसांच्या एक्सरे मध्ये खूप फरक दिसून आला. स्मोकरची फुफ्फुसं खूप काळी होती. कोरोनावर मात केलेल्या रुग्णाची फुफ्फुसं पांढरी दिसत होती.

ही फुफ्फुसं खूप पांढरी दिसत होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनसार कोरोनामुळे फुफ्फुसांपर्यंत योग्य प्रमाणात हवा न पोहोचल्यामुळे फुफ्फुसं अशी दिसत होती.

यांनी सांगितले की, ''कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तुमच्या फुफ्फुसांची स्थिती खूप खराब होऊ लागते. श्वास घेण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय फुफ्फुसांच्या इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.''

स्थानिक सीबीएस डिएफडब्ल्यूशी चर्चा करताना यांनी सांगितले की, लोकांनी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर कसा परिणाम होतो. तरच भविष्यात आरोग्यासंबंधी समस्या कमी होऊ शकतात.

कोरोनाच्या संक्रमणानंतर फुफ्फुसांवर तीव्र परिणाम होण्याची शक्यता असते. हा आजार उद्भवल्यास रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. हळूहळू रुग्णांच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासायला सुरूवात होते. अनेकदा या लक्षणांची कारणं कळून येत नाहीत.या कंडीशनला डॉक्टरर्स इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस असं म्हणतात.(ImageCredit- Aajtak)