ताप असो वा सर्दी खोकला सर्व आजारांवर रामबाण उपाय 'हे' 4 पदार्थ; असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 11:48 AM2019-11-08T11:48:34+5:302019-11-08T11:58:22+5:30

वातावरणात अचानक होणारे बदल आणि आहारातील बदलांमुळे शरीराला व्हायरल फिवरचा सामना करावा लागतो.

साधारणतः व्हायरल फिवरटी लक्षणं साधारण तापासारखीच असतात. परंतु, याकडे दुर्लक्षं केल्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सुरुवातीला घशात होणाऱ्या वेदना, खोकला, थकवा यांसारख्या समस्या उद्भवतात. याच्या लक्षणांमध्ये घशात वेदना होणं, अंगदुखी, खोकला, डोकेदुखी आणि त्वचेला रॅशेज होणं, सर्दी यांसारख्या समस्या उद्भवतात.

व्हायरल फिवर असल्यास खूप पाणी पिणं गरजेचं असतं. याव्यतिरिक्त ज्यूस आणि कॅफेनरहित चहाचं सेवन करा. जास्तीत जास्त फळांमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट्स आढळून येतात. ज्यांचं सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत होते. लिंबू, गवती चहा, पुदिना, साग, मध इत्यादी फायदेशीर ठरतं

लसूण जेवणाची चव वाढविण्यासोबतच अनेक आजार दूर ठेवण्यासाठी मदत करतो. कच्च्या लसणाचे तुकडे करून खा. तुम्ही लसणावर मध लावूनही खाऊ शकता. याव्यतिरिक्त लसणाच्या दोन पाकळ्यांमध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑइल एकत्र करून गरम करा आणि आपल्या पायांच्या तळव्यांना मसाज करा.

मध आणि आल्याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. व्हायरल फिवर आणि इतर समस्यांपासून बचाव करण्यासाठी आल्याची पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये मध एकत्र करून खा.

लवंग आणि आलं थंडित होणाऱ्या आजारांवर गुणकारी ठरतात. यासाठी दररोज एक लवंग आणि आलं खाऊ शकता. आलं आणि लवंगाचा चहाही उत्तम उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग भाजून खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं.)