या २ कारणांमुळे वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या संचालकांनी सांगितली मोठी कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 06:23 PM2021-04-17T18:23:36+5:302021-04-17T18:40:17+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लसीकरण सुरु झाल्यानंतर लोकांनी कोरोना गाईडलाईन्सचं पालन करणं थांवबले आणि निष्काळजीपणा वाढला त्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला.

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे देशात पुन्हा एकदा ताणतणावपूर्ण वातावरण पसरलं आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी सांगितलं आहे.

दुसऱ्या टप्प्यात रुग्णांची संख्या वाढण्याची अनेक कारणं आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे लसीकरण सुरु झाल्यानंतर लोकांनी कोरोना गाईडलाईन्सचं पालन करणं थांवबले आणि निष्काळजीपणा वाढला त्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला.

गुलेरिया यांनी सांगितले की, ''कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. आपल्याला हॉस्पिटलमधील बेड्सची संख्या सतत पुरेशी ठेवली पाहिजे. त्याचबरोबर वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक साधनसाग्रमीत वाढ करायला हवी. तरच आपण लवकरात लवकर या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवू,''

"देशात सध्या अनेक धार्मिक कार्यक्रम, विधानसभा निवडणुका देखील होत आहेत. कशाहीपेक्षा जीव वाचवणं महत्वाचं आहे. हे लक्षात घ्यायला हवं. अन्य गोष्टी एका मर्यादेत राहून आपण करु शकतो.

ज्यामध्ये लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, तसंच कोरोना गाईडलाईन्सचंही पालन होईल." अशी माहिती त्यांनी एएनआयशी बोलताना दिली.

''कोणतीही लस तुम्हाला 100 टक्के सुरक्षा देईलच असं नाही. लस घेतल्यानंतरही तुम्हाला लागण होऊ शकते. मात्र व्हॅक्सिन घेतल्यानं शरिरात तयार झालेल्या एंटीबॉडीमुळे व्हायरसच्या संक्रमणाची तीव्रता जाणवणार नाही.

त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता कमी होईल.'' असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,34,692 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटी 45 लाखांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,75,649 वर पोहोचला आहे.

Read in English