शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Covid Effect: कोरोनातून बरे झालेल्यांनो सावधान! ५० टक्के लोक एका समस्येशी झगडतायत; वर्षभर होतोय त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 5:32 PM

1 / 9
कोरोना संसर्गावर यशस्वीपणे मात केलेल्यांमध्येही लाँग कोविडच्या समस्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांचीही चिंता वाढली आहे. पोस्ट कोविडमधील समस्यांवर अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या एका टीमनं नुकताच एक अहवाल जारी केला आहे.
2 / 9
कोरोनाच्या पहिल्या लाटेत संक्रमिक झालेल्या जवळपास ५० टक्के लोकांमध्ये एक खास पद्धतीची समस्या समोर आली आहे. काही जणांना यातून बाहेर येण्यासाठी जवळपास दीड वर्षाहून अधिक कालावधी लागू शकतो असं दिसून आलं आहे.
3 / 9
स्विडनमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात वैज्ञानिकांनी नमूद केले आहे की कोरोनामुक्त झालेल्या जवळपास ५० टक्के लोकांमध्ये गंध ओळखू न शकण्याचा त्रास दिसून आला आहे. इतकंच नव्हे, तर काही जणांमध्ये हा त्रास कायमस्वरुपी आणि गंध ओळखण्याची भावनेला परावर्तित करण्याची समस्या निर्माण होण्याचंही कारण ठरण्याचीही शक्यता आहे.
4 / 9
एका रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये रुग्णांना गंध ओळखू न येण्याचा त्रास व लक्षणं दिसून येतात. पण कोरोनामुक्त झाल्यानंतरही हा त्रास काही काळ सुरूच असल्याचं निष्पन्न झालं आहे.
5 / 9
कोरोनातून बरं झाल्यानंतरही संबंधितांना गंध ओळखण्यास त्रास होत असल्याचं दिसून आलं आहे. गंध ओळखू न येण्याच्या समस्येला वैज्ञानिक लाँग कोविडचे संकेत असल्याचं मानत आहेत. दरम्यान, ओमायक्रॉनची लागण झालेल्यांमध्ये गंध ओळखू न येण्याची समस्या डेल्टा आणि अल्फा व्हेरिअंटच्या तुलनेत खूप कमी दिसूनं आलं आहे.
6 / 9
२०२० साली कोरोनाच्या पहिल्या लाटेत संक्रमित झालेल्या १०० रुग्णांचा पोस्ट कोविड इफेक्टसाठीचा अभ्यास केला गेला. यात वैज्ञानिकांना आढळून आलं की कोरोनातून बरं झाल्याच्या १८ महिन्यांनंतरही सुमारे ४ टक्के लोकांनी गंध ओळखण्याची क्षमता पूर्णपणे गमावली. तर एक तृतियांश लोकांनी गंध ओळखण्याची क्षमता कमी झाली होती आणि अर्ध्याजणांमध्ये पॅरोसमियाची तक्रार समोर आली आहे. यात संबंधित व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टींचा वेगळ्या पद्धतीनं गंध येतो.
7 / 9
वैज्ञानिकाच्या एका चमूनं असा निष्कर्ष काढला की, कोविडमधून बरं झालेल्यांपैकी सुमारे ६५ टक्के लोकांमध्ये दीड वर्षांनंतरही गंध ओळखण्याची क्षमता कमी असल्याचं दिसून आलं किंवा वस्तूंचा खरा गंध जाणून घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे.
8 / 9
कोरोनाचा विषाणू आपल्या ज्ञानेंद्रियांना नुकसान पोहोचवतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे अशाप्रकारची समस्या कोरोनातून बरं झालेल्यांमध्ये दिसून येते.
9 / 9
याशिवाय, कोरोनाची गंभीर स्वरुपाची लक्षणं जाणवलेल्यांना अशाप्रकारच्या समस्यांचा धोका जास्त असू शकतो. डेल्टा व्हेरिअंटच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या स्थितीत लोकांमध्ये कमी समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. पण यासाठी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा अस्तित्वात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त जागरुक राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य