शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिलासादायक! रशियानंतर 'या' देशातील नागरिकांना मोफत मिळणार कोरोनाची लस, सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 6:50 PM

1 / 9
कोरोनाच्या महामारीत लस कधी तयार होणार हे मोठं आव्हान समोर आहे. कारण अजूनही जगभरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे होत असलेल्या मृतांची संख्यादेखील वाढत आहे. जनजीवन सुरळीत होण्यासाठी लवकरात लवकर जगभरातील लोकसंख्येला लस मिळावी असं मत अनेकांकडून व्यक्त होत आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटनसह भारतातही लस लवकराच लवकर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
2 / 9
भारतात आरोग्य कमर्चारी वर्गाला तसंच सगळ्या फ्रंटलाईन्स कामागारांना लस सगळ्यात आधी दिली जाणार अशी माहिती सरकारकडून मिळाली आहे. आता जपान आपल्या नागरिकांना कोरोनाची लस मोफत देणार आहे. जपानच्या संसदेत याबाबतचे एक विधेयक मंजूर करण्यात आले. कोरोना लशीचा संपूर्ण खर्च जपानच्या सरकारकडून करण्यात येणार आहे.
3 / 9
लसीचे वितरण मोफत करण्याबाबत विधेयकाला वरिष्ठ सभागृहात मंजुरी देण्यात आली. आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लस देणयाची जबाबदारी स्थानिक प्रशासन, सरकारकडे असणार आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे बार आणि रेस्टोरंट्स लवकर बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
4 / 9
पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचे काही कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. जपानच्या नागरिकांना पुढच्या वर्षाच्या सहा महिन्यापर्यंत लसींचा पुरेसा साठा निर्माण करण्याचा निर्धार पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी व्यक्त केला आहे.
5 / 9
दरम्यान जपानी नागरीक लसीकरणाबाबत फारसे उत्सुक नाहीत. ऑक्टोबरमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली होती.
6 / 9
लस उपलब्ध झाल्यास ६९ टक्के जपानी नागरिकांनी लस टोचून घेण्यास अनुकूलता दर्शवली. तर, जागतिक पातळीवर हीच संख्या ७३ टक्के इतकी आहे.
7 / 9
जपान सरकारने लसीसाठी मॉडर्ना इंकसह करार केला आहे. तर, एस्ट्राजेनका आणि फायजरकडून लस खरेदीबाबत अनुकूलता दर्शवली आहे.
8 / 9
आता कोणती लस सगळ्यात आधी लसीकरणासाठी उपलब्ध असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
9 / 9
आता कोणती लस सगळ्यात आधी लसीकरणासाठी उपलब्ध असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या