CoronaVaccine: कोरोना लशीचा पहिला डोस किती प्रभावी? संशोधनातून मोठा खुलासा! आरोग्य मंत्रालयानं घेतला असा निर्णय

Published: June 14, 2021 05:53 PM2021-06-14T17:53:53+5:302021-06-14T18:09:40+5:30

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी, चंदीगड पीजीआयने केलेल्या या संशोधनाच्या खुलाशानंतर देशातील इतर प्रमुख वैद्यकीय संस्था आणि कॉरपोरेट रुग्णालयांनादेखील, यासंदर्भात संशोधन करायला सांगितले आहे. (CoronaVirus Vaccine Chandigarh pgi research)

आपण कोरोना लशीचा एक डोस घेतला असला तरी, आपल्याला 98 टक्के कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाही. चंदीगड पीजीआयच्या डॉक्टरांनी केलेले हे संशोध केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. (Coronavirus Chandigarh pgi research shows that first dose of corona vaccine is enough to curb)

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी, चंदीगड पीजीआयने केलेल्या या संशोधनाच्या खुलाशानंतर देशातील इतर प्रमुख वैद्यकीय संस्था आणि कॉरपोरेट रुग्णालयांनादेखील, यासंदर्भात संशोधन करायला सांगितले आहे. तसेच अनेक संस्थांनी संशोध सुरूही केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगड पीजीआयने, ज्या रुग्णांना लशीचा पहिला डोस दिला आणि ज्या लोकांना लशीचे दोन डोस देण्यात आले आहेत, त्यांच्यावर संशोधन केले.

या संशोधनात, ज्या लोकांना लशीचा एक डोस देण्यात आला त्यांना संक्रमणाचा धोका केवळ दोन टक्केच होता आणि ज्या लोकांना लशीचे दोन डोस देण्यात आले त्यांनाही संक्रमणाचा धोका केवळ दोनच टक्के होता, असे दिसून आले.

अर्थात, या संशोधनानंतर निदर्शनास आले, की लशीचा पहिला डोस लागताच कोरोना संक्रमणापासून बचावाची शक्यता 98 टक्क्यांपर्यंत पोहोचते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयात देशातील लसीकरणावर लक्ष ठेवणाऱ्या कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोडा म्हणाले, पीजीआयचे हे संशोधन सांगते, की लसीकरणाच्या पहिल्या डोसनंतरच लोक कोरोना व्हायरस संक्रमणापासून सुरक्षित होऊ लागतात. मात्र याचा अर्थ असा बिलकूल नाही, की देशात लसीकरणाच्या डोसचे वेळापत्रक बदलेल आणि दोन डोसच्या ऐवजी एकच डोस दिला जाईल.

अरोडा यांचे म्हणणे आहे, की कोरोनाचा पहिला डोसच आपला बचाव करू लागतो आणि लशीचा दुसरा डोस मिळाला, की रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच अंटीबॉडीज व्हायरसविरोधात लढण्यास पूर्णपणे सक्षम होतात, असे या संशोधनातून समोर आले आहे.

चंदीगड पीजीआयच्या संशोधनाबरोबर देशातील अनेक मोठ्या रुग्णालयांत आणि कॉरपोरेट रुग्णालयांतही अशा प्रकारचे संशोध सुरू झाले आहे. पुढील काही दिवसांतच ते संशोधनही समोर येईल.

आरोग्य मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की त्या संशोधनानंतर कोविड नॅशनल टास्क फोर्स आणि लसीकरणाशी संबंधित समिती पुढील रणनीतीवर काम करतील.

कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना लस अत्यंत महत्वाची...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!