Coronavirus: धक्कादायक! कोरोनापासून वाचवणाऱ्या सॅनिटायझरने होऊ शकतो कॅन्सर! 44 हॅन्ड सॅनिटायझर अत्यंत घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 01:11 PM2021-03-25T13:11:28+5:302021-03-25T13:24:17+5:30

...आपण ज्या सॅनिटायझरचा वापर करतो, त्यांपैकी 44 सॅनिटायझरमध्ये कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या घातक रासायनिक घटकांचा वापर केला जात आहे. (hand sanitizer)

चीनमधून निघलेल्या आणि संपूर्ण जगात हाहाकार घालत असलेल्या कोरोना व्हायरस महामारीमुळे आपल्या जीवनशैलीत आणि सवयीत मोठा बदल झाला आहे. कोरोना महामारीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण मास्क वापरणे, हात सॅनिटाइझ करणे आणि डिस्टंसिंग पाळण्यासारख्या सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत. यातच एक अत्यंत धक्कादायक आणि चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे...

...आपण ज्या सॅनिटायझरचा वापर करतो, त्यांपैकी 44 सॅनिटायझरमध्ये कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या घातक रासायनिक घटकांचा वापर केला जात आहे. नुकतीच एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे.

जागतिक महामारी कोरोना व्हायरसमुळे जगभरात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णालयांपासून ते घरा-घरापर्यंत आणि मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सॅनिटायझरचा वापर सुरू आहे.

अशात, सॅनिटायझरचा दीर्घकाळ वापर केल्यास कॅन्सर अथवा त्वचारोग होण्याची भीती आहे का? हे जाणून घेण्यासाठी, व्हॅलिजरने (Valisure) 260 हून अधिक हॅन्ड सॅनिटायझरवर सविस्तर अध्ययन केले आहे.

या अध्ययनानंतर, व्हॅलिजरने अमेरिकन खाद्य तथा औषध विभागाला (एफडीए) एक पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली आहे.

एफडीएला लिहिलेल्या पत्रात व्हॅलिजरने म्हटले आहे, की कोरोना महामारीमध्ये हॅन्ड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. यातच, न्यू हेवन येथील एका ऑनलाइन फार्मसी व्हॅलिजरने अनेक ब्रांड्सच्या 260 हून अधिक हॅन्ड सॅनिटायझरचे अध्यन कले. यांपैकी तब्बल 44 हून अधिक सॅनिटायझरमध्ये बेंझीनसह कॅन्सरचा धोका वाढवणारे घातक रसायनं आढळून आले आहेत.

बेंझीन म्हणजे काय - बेंझीन एक प्रकारचे रसायन आहे. हे सर्वसाधारणपणे रंगहीन असते. मात्र, हे कधी-कधी रुममध्ये सामान्य तापमानाला पिवळ्या रंगाचे दिसते.

बेंझीन उच्च स्थरावर संपर्कात आल्यास शरीरातील रक्त पेशी व्यवस्थितपणे कार्य करत नाहीत. कधीकधीतर लाल रंक्त पेशी तयार होणेही थांबते अथवा पांढऱ्या पेशी कमी व्हायला सुरवात होते. यामुळे मानवाची रोग प्रतिकार शक्ती कमी होते.

जागतीक आरोग्य संघटनेची इंटरनॅशनल एजन्सी 'रिसर्च ऑन कॅन्सर'ने बेंझीनची ओळख कार्सिनोजेनच्या रूपात केली आहे. कार्सिनोजेनला सर्वाधिक धोका असलेल्या श्रेणी ग्रुप-1 मध्ये ठेवण्यात आले आहे.

कार्सिनोजेन (carcinogen) एक असा पदार्थ असतो, ज्यामुळे रेडिएशन अथवा इतर काही गोष्टी होतात. ज्यामुले शरीरात कर्करोग (कॅन्सर) होण्याची शक्यता निर्माण होते.