शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 1:20 PM

1 / 8
भारतामध्ये कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असतानाच जगातील इतर देशांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची नामुष्की अनेक देशांवर ओढवण्याची शक्यता वाढली आहे.
2 / 8
इस्राइलमध्ये शुक्रवारपासून पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊनची सुरुवात झाली आहे. या लॉकडाऊनदरम्यान तीन आठवड्यांसाठी जनतेवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. लॉकडाऊनदरम्यान, लोकांना आपल्या घरापासून एक किलोमीटरहून अधिक लांब जाता येणार नाही.
3 / 8
कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करणारा इस्राइल हा जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र इस्राइलप्रमाणेच इतर अनेक देशही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत.
4 / 8
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येताना दिसत आहे. त्यामुळे देशामध्ये सहा महिन्यांपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याची गरज भासत आहे. कोरोना्च्या दुसऱ्या लाटेच्या बाबतीत ब्रिटन स्पेन आणि फ्रान्सपेक्षा सहा आठवड्यांनी मागे आहे. मात्र ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार हे निश्चित आहे.
5 / 8
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनेही युरोपमध्ये येत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण चिंताजनक पद्धतीने वाढत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येकडे आपण एक इशारा म्हणून पाहिले पाहिजे, असे डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक हंस क्लूज यांनी यांनी सांगितले.
6 / 8
एका आठवड्यात सापडणाऱ्या रुग्णांची संख्या ही मार्च महिन्यात युरोपमध्ये कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर मिळत असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक झाली आहे. युरोपमध्ये एका आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३ लाखांच्या वर पोहोचली आहे, असे हंस क्लूज यांनी सांगितले.
7 / 8
युरोपमधील अर्ध्याहून अधिक देशांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून नव्या रुग्णांच्या संख्येमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे. यामध्ये सात देशात कोरोनाचे नवे रुग्ण हे दुप्पट झाले आहेत.
8 / 8
दरम्यान, जगभरातील कोरोनाबाधिकांची संख्या तीन कोटी ७ लाखांहून अधिक झाली आहे. त्यापैकी ९ लाक ५६ हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाEnglandइंग्लंडIsraelइस्रायल