CoronaVirus: भाज्या, धान्य, दूध घेताना काय काळजी घ्याल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:11 PM2020-04-06T17:11:25+5:302020-04-06T17:21:10+5:30

फळभाज्या घेताना शक्यतो त्यांना हात न लावता थेट पिशवीत टाकायला सांगाव्या.

आणलेल्या भाज्या एका भांड्यातील पाण्यात ओताव्या. पिशवी घरात न ठेवता घराबाहेर न ठेवता घराबाहेर किंवा छतावर उन्हात टाकावी.

पालेभाज्या पाण्यात (शक्यतो कोमट) काही वेळ पूर्ण बुडवून ठेवाव्या व फळभाज्या, फळे १२ तास पाण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवाव्या.

पाण्यातून बाहेर काढल्यावर सर्व भाज्या व फळे हेअर ड्रायरच्या गरम वाऱ्याखाऊन जाऊ द्यावे.

या काळात सध्या कच्च्या भाज्या मुळीच खावू नये. शिजवूनच खाव्या.

दूध पिशवीतून घेत असाल तर पिशवी बाहेरुन धुवून घ्यावी.

जर गवळ्याकडून घेत असाल तर स्वच्छ भांडे घराबाहेर ठेवावे आणि गवळ्याला भांड्याला न शिवता दूध भांड्यात टाकायला सांगा.

किराणा माल आणताना, भाजी घेतानाचे सगळे नियम व पिशवी बाहेर किंवा छतावर ठेवण्याचा नियम पाळावा तसंच किराणा सामान एक दिवस न वापरता तसंच राहू द्यावं. २४ तासानं वापरायला काढावं.

कुठलेही बाहेरचं सामान आणल्यावर घरात आल्या आल्या हात धुवायला विसरू नका.