शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: बापरे! कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा संक्रमित होण्याची भीती, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 11:34 AM

1 / 12
कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, अनेक देशांनी कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशांना बसला आहे.
2 / 12
परंतु त्या देशात आता काही प्रमाणात परिस्थिती सुधारत असल्याचं चित्र आहे. स्पेनमध्ये जवळपास 70 हजार लोकांवर कोरोना विषाणूचा अभ्यास करण्यात आला आहे.
3 / 12
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरोना अँटीबॉडीसाठी 14 टक्के लोक सकारात्मक आढळले होते, पण कालांतरानं ते अँटीबॉडीज चाचणीमध्ये नकारात्मक दिसून आले.
4 / 12
म्हणजेच काही आठवड्यांत अँटीबॉडीज त्यांच्या शरीरातून गायब झाल्या. अभ्यासानंतर डॉक्टरांनी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
5 / 12
इंग्लंड युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगमध्ये वायरोलॉजीचे प्रोफेसर इयान जोन्स म्हणाले की, अभ्यासाचा निकाल प्रकाशित झाल्यानंतर असे दिसून आले आहे की, जे कोरोनातून बरे झाले आहेत आणि त्यांचे अँटीबॉडीज चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत, त्यांनी आता स्वतःला कोरोनापासून सुरक्षित समजू नये.
6 / 12
प्रोफेसर जोन्स म्हणाले की, कोरोना अँटीबॉडीज चाचणीत सकारात्मक लोक कोरोनापासून सुरक्षित असतीलच हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
7 / 12
म्हणून अशा लोकांनीही या क्षणी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. स्पेनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात अँटीबॉडीज कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातून गायब झाल्याचे आढळले.
8 / 12
विशेषत: सौम्य लक्षणांमुळे संक्रमित झालेल्या लोकांच्या शरीरातून 2 महिन्यांनंतर हे अँटीबॉडीज गायब झाले आहेत.
9 / 12
डॉक्टर असे गृहित धरत आहेत की, कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये अँटीबॉडीज मोठ्या प्रमाणात विकसित होत नाहीत.
10 / 12
स्पेनच्या कार्लोस-3 हेल्थ इन्स्टिट्यूटचे संचालक, रकिल योगी म्हणाले, ' अशात रोगप्रतिकार शक्ती अपूर्णावस्थेत वाढू शकते.
11 / 12
रोग प्रतिकारशक्ती देखील तात्पुरत्या स्वरूपातील असू शकते. हे थोड्या काळासाठी असू शकते आणि त्यानंतर कोरोनातून बरी झालेली व्यक्ती पुन्हा एकदा संक्रमित होऊ शकते.
12 / 12
आपण सर्वांनी स्वतःचे संरक्षण केले पाहिजे आणि इतर लोकांचेही संरक्षण केले पाहिजे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या