शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : कोरोना स्ट्रेनचं भयावह रूप! २४ तासात महिलेचे फुप्फुसं खराब, एक्स-रे पाहून डॉक्टर 'कोमात'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 3:36 PM

1 / 12
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. अशात राजस्थानच्या कोटामधून एक धक्कादायक केस समोर आली आहे. इथे केवळ २४ तासात ३२ वर्षीय महिलेचे दोन्ही फुप्फुसं खराब झाले आहेत. फुप्फुसांचे एक्स--रे समोर आले आहेत.
2 / 12
ही केस आहे कोटामधील. येथील ३२ वर्षीय महिलेने ९ तारखेला एक्स-रे काढला तेव्हा ती ठीक होती. १२ तारखेपर्यंत महिल ठीक होती. बीपी, ऑक्सीजन लेव्हल, एक्स-रे सगळं काही ठीक होतं. त्यानंतर १ तारखेला रात्री तिला जरा घाबरल्यासारखं वाटू लागलं होतं.
3 / 12
महिला १३ तारखेला उभीही राहू शकत नव्हती. तिला श्वास घेण्यास त्रास होता होता. ऑक्सीजन लेव्हल चेक केलं तर ९४ होतं. १३ तारखेला सिटी स्कॅन केला तर तिचे दोन्ही फुप्फुसांमध्ये ८० टक्के इन्फेक्शन झालेलं होतं.
4 / 12
हे बघून कोटाचे श्वास रोग तज्ज्ञ डॉक्टर के के डंग हे हैराण झाले. कारण केवळ २४ तासात तिची फुप्फुसे खराब झाली होती. त्यांनी इंदुरच्या एका डॉक्टरसोबत याबाबत चर्चा केली तर त्यांनी सांगितले की, हा नवा स्ट्रेन आहे ज्यामुळे असं झालंय.
5 / 12
हे बघून कोटाचे श्वास रोग तज्ज्ञ डॉक्टर के के डंग हे हैराण झाले. कारण केवळ २४ तासात तिची फुप्फुसे खराब झाली होती. त्यांनी इंदुरच्या एका डॉक्टरसोबत याबाबत चर्चा केली तर त्यांनी सांगितले की, हा नवा स्ट्रेन आहे ज्यामुळे असं झालंय.
6 / 12
डॉक्टरांनी सांगितले की, हा नवा स्ट्रेन वेगाने पसरत आहे. हा तरूणांमध्येही वेगाने लंग्स इन्फेक्शन पसरवत आहे. आपण या केसमधून शिकलं पाहिजे आणि लक्षणे दिसली तर टेस्ट केली पाहिजे. कारण कोरोना आता वेळ देत नाहीये. बीपी ऑक्सीजन लेव्हल, एक्स रे सगळं काही ठीक असल्यावरही एकदम लंग्स इन्फेक्शन होऊ शकतं.
7 / 12
कोरोना रूग्णांमध्ये काही नवीन आणि अनोखी लक्षणे बघायला मिळत आहे. सर्वच वयोगटातील लोकांवर या व्हायरसचा सारखाच धोका आहे. व्हायरसचा हा नवा स्ट्रेन आपल्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे घेऊन आला आहे.
8 / 12
कोविड टंग - कोविड टंग हेही एक नवं लक्षण आहे. यात व्यक्तीच्या जिभेचा रंग पांढरा होऊ लागतो. जिभेवर हलके-हलके डाग दिसतात. तोंडात लाळ तयार होणं बंद होतं. ही लाळ आपल्याला हानिकारक बॅक्टेरियापासून वाचवते.
9 / 12
जीरोस्टोमिया - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये यावेळी एक ओरल लक्षण दिसत आहे. डॉक्टर याला जीरोस्टोमिया(तोंड कोरडं पडणे) म्हणतात. यात तोंडाच्या आत सॅविलवी ग्लॅंड काम करणं बंद करते. व्यक्तीचं तोंड कोरडं पडू लागतं.
10 / 12
कोविड टंग - कोविड टंग हेही एक नवं लक्षण आहे. यात व्यक्तीच्या जिभेचा रंग पांढरा होऊ लागतो. जिभेवर हलके-हलके डाग दिसतात. तोंडात लाळ तयार होणं बंद होतं. ही लाळ आपल्याला हानिकारक बॅक्टेरियापासून वाचवते.
11 / 12
चावण्यात-थुंकण्यात अडचण - यात लक्षणात व्यक्तीला चावण्यात आणि थुंकण्यात अडचण येते. व्हायरस तोंडातील सेंसेशन प्रभावित करतो. तोंडात अल्सरमुळे नेहमीच चावताना मांसपेशीत वेदना होते.
12 / 12
पिंक आय - कोरोनाच्या स्ट्रेनमद्ये डोळ्यांशी संबंधित एक नवं लक्षण दिसत आहे. चीनमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, कोविड-१९ ने संक्रमित रूग्णाचे डोळे हलके लाल किंवा गुलाबी दिसतात. तसेच हलकी सूज आणि सतत पाणी वाहतं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थानHealthआरोग्य